काव्यसौंदर्य सद्यास्थितीत स्त्री-पुरुष समानता' बाबत कवयित्रीने मानशी बाळगलेला आशावाद खरा ठरताना दिसतो का? तुमच्या शब्दत तुमचे मत स्पष्ट करा
Answers
Answer:
मराठी साहित्यात पुरातन काळापासून स्त्री-पुरुष समानतेचा धागा सापडतो. स्त्री आणि पुरुषाने एकमेकांना त्यांची त्याची स्पेस देणे आणि दोघांनी एकमेकांचा आदर राखणे, हीच खरी स्त्री-पुरुष समानता आहे', असा सूर परिसंवादात उमटला.
कृषिविकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या सातव्या लेखिका संमेलनात रविवारी 'मराठी साहित्यातून स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन' विषयावर परिसंवाद पार पडला. थडीपवनीतील नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राच्या प्रांगणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यासपीठावर झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीकांत तिडके होते. डॉ. स्वाती दामोदरे, सना पंडित, वृषाली देशपांडे व डॉ. भगवान ठाकरे यांनी या परिसंवादात सहभाग नोंदवला.
मराठी साहित्यामध्ये अजूनही स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन दिसत नसल्याचे डॉ. भगवान ठाकरे यांनी सांगितले. जोपर्यंत लेखक आणि लेखिका स्त्रीवादी चळवळीचा भाग होणार नाहीत, तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता आली, असे मानता येणार नाही, असा मुद्दा डॉ. ठाकरे यांनी मांडला. मात्र, स्वाती दामोदरे यांनी पुरातन काळापासून मराठी साहित्यात स्त्री-पुरूष समानता झळकत असल्याचे उदाहरण देत सांगितले. स्त्री स्वतंत्र असल्याचा उल्लेख अनेक लेखिकांच्या लिखाणात आला असल्याचे त्या म्हणाल्या. नारायण सुर्वे, अनिल अवचट यांच्यासारख्या लेखकांच्या लिखाणातही त्याचा प्रत्यय येतो, असे त्या म्हणाल्या. वृषाली देशपांडे यांनी अर्धनारीनटेश्वराच्या प्रतिमेतही हा धागा सापडतो, असे सांगितले. ताराबाई शिंदे, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, आगरकर यांच्यासह आशा बगे, कमल देसाई, सानिया, मेघना पेठे, इरावती कर्वे यांच्या साहित्यात स्त्री-पुरुष समानतेची बिजे दिसतात. स्त्रियांचा अपमान करणारे काही विशिष्ट वाक्प्रचार, उल्लेख जोपर्यंत चलनात आहेत तोपर्यंत पूर्ण समानता आली असे म्हणता येणार नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला.
सना पंडित यांनी, 'स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता आहे, मात्र आपण ती स्वीकारायला तयार नाही', असा मुद्दा मांडला. अध्यक्षीय भाषणातून डॉ. श्रीकांत तिडके यांनी स्त्रीवाद हा राजकीय व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. स्त्रियांचे प्रश्न हे धर्माच्या पलीकडचे आहेत. ज्यादिवशी स्त्रिया बोलायला लागतील तेव्हा त्यांना खरे स्वातंत्र्य मिळेल. पुरुषांमधील मातृत्व आणि स्त्रीमधील पितृत्व जेव्हा दिसू लागेल तेव्हा बदल व्हायला सुरुवात होईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता आठवले यांनी केले. आभार आभा मेघे यांनी मानले.