४) क्युम्युलस ढगांचे क्युम्युलो निम्बस ढगात रुपांतर होते.
answer-
Answers
Answer:
४ )क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगांत रूपांतर होते . उत्तर -क्युम्युलस ढगांचा पृष्ठभागापासून५०० ते६०० मीउंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो . या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो . उभ्या विस्तारात वाढ झाल्यामुळे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोमिम्बस ढगांत रूपांतर होते .
Explanation:
Answer:
क्यूमुलो निंबस म्हणजे काय? त्यामुळे पाऊस कसा पडतो?
क्यूमुलो निंबस हा ढगांचा एक प्रकार असून क्यूमुलो म्हणजे उपड्या वाटीसारखा आणि निंबस म्हणजे पाऊसवादळ होय. म्हणजे एखाद्या ऐरणीसारखा आणि उंचच उंच पसरलेला पाऊस देणारा ढग होय.
"सांद्रीभवन प्रक्रियेने वातावरणातील जलयुक्त बाष्पाचे सूक्ष्म जलकणात अथवा हिम/बर्फ कणात रूपांतरण झाल्यामुळे निलंबित अवस्थेत अथवा टांगलेल्या स्थितीत वातावरणात सतत भ्रमण करणारे जल अथवा हिम/बर्फ कणांचे दृश्य पुंजके म्हणजे ढग अथवा मेघ होत."
ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहीत अवस्थेत असतात. म्हणजेच ते वजनाने अत्यंत हलके असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात.
वातावरणातील भौतिक क्रिया प्रक्रियांनी विविध प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.