Political Science, asked by anummukadam33, 4 months ago

२) कलेचा हेतू कोणता असतो?​

Answers

Answered by harshadupadhye1008
3

ANSWER

डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या मते, कलावंत कशासाठी कला निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतूने तिचा आस्वाद घेतो, स्वीकार करतो या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रयोजनविचार महत्त्वाचा आहे. कलानिर्मिती ही व्यावहारिक गोष्ट नाही, त्यामुळे तिच्या निर्मितीचे प्रयोजन ही गोष्ट गुंतागुंतीची आहे. त्यामुळे प्रयोजनाचा विचार कलानिर्मितीमधील महत्त्वाचा विचार आहे

साहित्याच्या प्रयोजनाचा विचार प्राचीन आणि आधुनिक साहित्यशास्त्रात सातत्याने चर्चिला गेला आहे. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. कवी वा लेखक कोण्या हेतूने उद्देशाने लिहितो, व वाचक कोणत्या हेतूने वाचतो हा निर्मितिप्रक्रियेतील व आस्वादप्रक्रियेतील महत्त्वाचा प्रश्न असून भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही मीमांसकांनी या प्रयोजनांचा विचार केला आहे.

Similar questions