कर्मणी प्रयोग १०उधरण दाखवा
Answers
Answer:
क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
उदा .
राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
2. नवीन कर्मणी प्रयोग
3. समापन कर्मणी प्रयोग
4. शक्य कर्मणी प्रयोग
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग :
हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.
उदा.
नळे इंद्रास असे बोलीले.
जो – जो किजो परमार्थ लाहो.
2. नवीन कर्मणी प्रयोग :
ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा .
रावण रामाकडून मारला गेला.
चोर पोलिसांकडून पकडला गेला.
3. समापण कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
त्याचा पेरु खाऊन झाला.
रामाची गोष्ट सांगून झाली.
4. शक्य कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोगअसे म्हणतात.
उदा .
आई कडून काम करविते.
बाबांकडून जिना चढवितो.
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :
कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
त्याने काम केले.
तिने पत्र लिहिले.
plz mark as brainlist