India Languages, asked by shriyashgore892004, 10 months ago

कर्मधारय समासाची याख्या आणि उदाहरण.​

Answers

Answered by janhavim28
6

Answer:

ज्या समासामध्ये पहिले पद विशेषण असते व दुसरे पद नाम असते त्या समासाला कर्मधारय समास म्हणतात. उदा. कमलनयन,रक्तचंदन,महादेव

  • नोट: सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर समास ओळखण्यास मदत होईल
Answered by varadad25
90

उत्तर :-

कर्मधारय समास

  • कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे.
  • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

उदा., १) नीलकमल => नील + कमल (निळे कमळ)

⬇️ ⬇️

विशेषण + नाम

विग्रह - नील असे कमल.

२) मातृभूमी => मातृ + भूमी (मातेसारखी भूमी)

⬇️ ⬇️

विशेषण + नाम

विग्रह - भूमी हीच माता.

◾थोडेसे अधिक

तत्पुरुष समास :-

ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते, त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions