कर्ते सुधारक कर्वे धड्या खालील प्रश्न उत्तरे
if u don't know so don't dare to give irrelative ans
Answers
Explanation:
answer in above attachment
स्वमत
( आ ) ' जया अंगी मोठेपण , तया यातना कठीण ' हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते , ते स्पष्ट करा .
उत्तर : अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते . ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते . त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही . समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही . समाजाने साथ दिली नाहीच ; उलट पराकोटीचा विरोध केला . त्यांचा सतत अपमान केला . त्यांना धक्काबुक्की केली . त्यांचे कपडे फाडले . हे रोज घडत होते . त्यामुळे स्वत : चे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई . स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई . त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे . त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता . हे सर्व यातनामय होते . लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या . आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो . परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख , कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या . ' जया अंगी मोठेपण , तया यातना कठीण ' हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते .
( इ ) ' कर्ते सुधारक कयें या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण , तुमच्या शब्दांत सांगा .
उत्तर : अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते . बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो . ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात . अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती . त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता . पण गर्व नव्हता . ते कधीच आक्रमक बनले नाहीत . उलट ते शांतपणे , कोणावरही न रागावता , आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत . त्यांचे अपमान झाले . अडवणूक झाली . त्यांच्यावर हल्ले झाले . जाता - येता त्यांचे कपडे फाडले गेले . पण ते विचलित झाले नाहीत . घाबरले नाहीत किंवा दुःखी - कष्टीही झाले नाहीत . ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले . नव्हे ते स्थितप्रज्ञच होते . हा त्यांचा गुण , त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे . खूप आवडला आहे .
Answer:
oopes sorry
thank you so much
Mrs. krushika
but that's enough ig
May god bless you and your family
night