India Languages, asked by kamalakarvarun4124, 2 months ago

'कर्ते सुधारक कर्वे ' या पाठातून महर्षी कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले गुण स्पष्ट करा.​

Answers

Answered by sherakipuja
4

Answer:

अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखी-कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले नव्ह

ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.

Similar questions