History, asked by akanksha57796, 1 year ago

Kasara Ghat Chi Mahiti in Marathi nibandh​

Answers

Answered by AadilAhluwalia
123

कासार घाट हा महाराष्ट्रातील एक घाट आहे. त्याला थुल घाट म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा घाट मुंबई- नाशिक मार्गावर आढळतो. कसारा घाट पश्चिमी घाटांचा एक भाग आहे. ह्या घाटातून जाणारी रेल्वे भारतातील सर्वात जास्त उतारणीचे रेल ठिकाण मानले जाते. या घाटाची उंची १९१९ फूट अशी आहे.

आधी ह्या घाटात प्राणघेणे अपघात होत असत पण जेव्हापासून २ पदरी रस्ते बनवण्यात आले तेव्हापासून अपघाताचे प्रमाण कमी आहे. रस्ते बनवण्याचे काम एप्रिल २००९ मध्ये जाळे होते. हा रस्ता गाडी चालकासाठी एक सुंदर अनुभव आहे यात शंका नाही.

Answered by pranjalm760
14

Answer:

I hope this is best for you

Explanation:

कसारा घाटातील रेल्वेसाठी सुरक्षिततेच्या पुरेशा आवश्यक उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. मागील 81 वर्षात केवळ 11 वेळेसच या मार्गाची डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गावर दरड कोसळण्याचा, रेल्वे रूळ खचण्याच्या धोका कायम आहे.

मुंबई-नाशिक रेल्वेस्थानकादरम्यान प्रवासातील धोक्याच्या वळणांवरील ओव्हरहेड वायर तुटणे तसेच रेल्वे रूळ खचण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. कसारा घाटातील नागमोडी वळणे व तीव्र चढ-उतारांच्या मार्गावरून नाशिक, भुसावळ, मनमाड, नागपूर या मार्गावर लांब पल्ल्याच्या सुमारे 40 गाड्या जातात. थळ घाटातील प्रवासादरम्यान पावसाळ्यात दरडींच्या धोक्यामुळे गाडी वारंवार थांबवली जाते. दरड कोसळण्याच्या ठिकाणी रोलिंग प्रेस संरक्षक जाळ्या लावण्यात आलेल्या नाहीत. बोगद्यातील दगड, माती खचत चालली आहे.

Similar questions