कष्टाची भाकरी हीच खरी सुखाची भाकरी कथालेखन करा
Answers
Answer:
चंद्रभान सात्रळकर
एका खेडेगावामध्ये लाकडाच्या मोळ्या विकणारा गरीब मजूर राहत होता. रोज जंगलामध्ये जाऊन स्वत:च्या पोटपाण्यासाठी प्रपंच करत होता. दिवसभर काबाडकष्ट करुन रोजीरोटी कमवत होता आणि नेहमी विवंचनेत असायचा. देवा एवढं कष्ट करुन माझ्या लेकराबाळांना पोटभर अन्न वस्त्र देऊ शकत नाही, सारखा त्याच काळजीत असायचा.एक दिवस देवाला त्याची दया आली आणि देवाने ठरवलं याला काही तरी देऊया. कारण देवळात जाऊन नियमित प्रार्थना करी. पण त्यामुळे त्याच्या आयुष्यात काही फरक पडत नव्हता. देवाने त्याची परीक्षा पहायचं ठरवलं आणि रुपये, सोने नाणे भरलेला बटवा मोळीविक्या मजूर ज्या वाटेने जाईल त्या वाटेवर ठेवला. जेणेकरुन तो पैशाचा बटवा त्याला मिळेल आणि त्याचं भलं होईल. आपल्याच विवंचनेत मोळी विकणारा तो मजूर रस्त्याने चालू लागला. त्याच्या मनात एक विचार आला की, आंधळा माणूस रस्त्याने कसा बरं चालत असेल.