कथालेखन
खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कथा लिहा.
ए.पी.जे. अब्दुल कलाम- जन्म व शिक्षण - रामेश्वरम - बहिणीने दागिने विकून शिक्षणासाठी पैसे व मद्रास
टेक्नॉलॉजीत प्रवेश - भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील कार्य - अग्नी क्षेपणास्त्र संशोधन - वैज्ञानिक
सल्लागार - भारताचे अकरावे राष्ट्रपती.
Answers
डॉ ए .पी .जे .अब्दुल कलाम ए.पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली रामेश्वर येथे झाला. लहानपणीच वडीलांचे निधन झाल्याने ते गावात वर्तमान पत्र लिखूं आणि लहानमोठी कामे करुन पैसे कमवित होते. ते अभ्यासात खूप हुशार होते. गणित त्यांचा आवडता विषय होता. बी. एस. सी पूर्ण झाल्यावर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा त्यांना त्यांच्या बहिणीने आपले दागिने विकून पैसे दिले. भारतीय अवकाश संस्थेच्या क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात भाग घेऊ लागले.
अग्नी क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणी मुळे डॉ कलाम यांचे जगभरात कौतुक होऊ लागले. पंतप्रधान यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. नंतर त्यांनी संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ चे प्रमुख म्हणून महत्वाच्या भूमिका बजावल्या.
भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व भारत रत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे अकरावे राष्ट्रपती झालेले डाॅ.कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.