कथालेखन मुद्दे आई व मुलगी _ फणस पिकवणे _ मुलाला गरयांची आवड _ आईने आधी गरे शेजारयाना वाटने _ मुलगा नाराज _ आईने समजाविणे _ देतो तो देव _ राखून ठेवतो तो
राक्षस
Answers
कथा लेखन.
Explanation:
देतो तो देव राखून ठेवतो तो राक्षस.
- एका गावात अश्विन नावाचा मुलगा राहायचा. तो त्याच्या आईला त्यांच्या शेतात फणस लावायला मदत करायचा. अश्विनला फणसाची गरे खायला फार आवडायचे.
- अश्विन नेहमी फणस पिकण्याची वाट बघायचा आणि त्यातील गरे खाण्यासाठी उत्सुक असायचा. त्याला गरे कोणासोबत वाटून खाणे आवडत नसायचे.
- थोड्या दिवसांनी अश्विनच्या शेतामधील फणस पिकले व त्याने त्याच्या आईसोबत फणस शेतातून काढायची सुरुवात केली.
- अश्विनच्या आईने फणसाची गरे काढून आगोदर त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये वाटून दिले. अश्विनला हे आवडले नाही. त्याला गरे कोणालाच न देता स्वतःच खायचे होते, म्हणून तो नाराज झाला.
- तेव्हा आईने त्याला समझावले व त्याला ती म्हणाली, "बाळा, तुझे असे वागणे चुकीचे आहे. प्रत्येक माणसाने स्वार्थी न बनून इतरांचा विचार केला पाहिजे.आपल्याकडे एखादी वस्तू जर भरपूर प्रमाणात असेल, तर ती वस्तू आपण इतरांसोबत वाटली पाहिजे. असे केल्याने इतरांसोबत आपल्यालासुद्धा आनंद मिळते."
- तेव्हा, अश्विनला त्याची चूक कळाली.
- तात्पर्य: एखादी गोष्ट इतरांसोबत वाटल्यावर त्या गोष्टीचा आनंद आणखी वाढतो.
Explanation:
देतो तो देव राखून ठेवतो तो राक्षस.
एका गावात अश्विन नावाचा मुलगा राहायचा. तो त्याच्या आईला त्यांच्या शेतात फणस लावायला मदत करायचा. अश्विनला फणसाची गरे खायला फार आवडायचे. अश्विन नेहमी फणस पिकण्याची वाट बघायचा आणि त्यातील गरे खाण्यासाठी उत्सुक असायचा. त्याला गरे कोणासोबत वाटून खाणे आवडत नसायचे. थोड्या दिवसांनी अश्विनच्या शेतामधील फणस पिकले व त्याने त्याच्या आईसोबत फणस शेतातून काढायची सुरुवात केली. अश्विनच्या आईने फणसाची गरे काढून आगोदर त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये वाटून दिले. अश्विनला हे आवडले नाही. त्याला गरे कोणालाच न देता स्वतःच खायचे होते, म्हणून तो नाराज झाला.
तेव्हा आईने त्याला समझावले व त्याला ती म्हणाली, "बाळा, तुझे असे वागणे चुकीचे आहे. प्रत्येक माणसाने स्वार्थी न बनून इतरांचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे एखादी वस्तू जर भरपूर प्रमाणात असेल, तर ती वस्तू आपण इतरांसोबत वाटली पाहिजे. असे केल्याने इतरांसोबत आपल्यालासुद्धा आनंद मिळते." तेव्हा, अश्विनला त्याची चूक कळाली.
तात्पर्य: एखादी गोष्ट इतरांसोबत वाटल्यावर त्या गोष्टीचा आनंद आणखी वाढतो.