(३) कथालेखन
-
• पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा :
परिसरातील नर्स उत्साही, मनमिळाऊ, परोपकारी परिसरात
कोरोनाची साथ नर्स दिवसरात्र कोरोना रुग्णांसाठी राबते लोक
अघोषित बहिष्कार घालतात - नर्स दु:खी, पण मनोभावे सेवा
चालूच
परिसरातील एका घरी कोरोना रुग्ण नर्स मदतीसाठी
सर्वजण भारावतात सत्कार करतात.
-
धावून जाते
Answers
Answered by
37
कथालेखन
Explanation:
"कर्तव्यदक्षतेचे महत्व"
- एका शहरात सुनीता नावाची नर्स राहत होती. तिच्या परिसरात सगळ्यांना ती तिच्या स्वभावामुळे आवडत असे. ती स्वभावाने मनमिळाऊ व परोपकारी होती. रूग्णांची ती नेहमी मदत करत असे.
- कोरोना काळातसुद्धा तिने कोरोना रूग्णांची दिवस रात्र सेवा केली. हॉस्पिटलमध्ये ती त्यांच्यासाठी राबायची.
- परंतु, परिसरातील लोकांना असे वाटू लागले की नर्समुळे आपल्याला कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. म्हणून, त्यांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. कोणीच तिच्याशी बोलत नसे.
- लोकांच्या स्वभावात आलेल्या परिवर्तनामुळे तिला फार वाईट वाटले. तरीही तिने मनोभावाने कोरोना रूग्णांची सेवा करणे सुरुच ठेवले.
- काही दिवसांनी परिसरात एक कोरोना रूग्ण सापडला. सगळे लोकं घाबरले. परंतु, नर्स त्या रूग्णाच्या मदतीसाठी धावून आली.
- तिच्या या कृत्यामुळे सगळे लोक भारावून गेले. त्यांनी नर्सची माफी मागितली व तिचे सत्कार केले.
- तात्पर्य: प्रत्येकाने आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले पाहिजे.
Similar questions