Hindi, asked by sarthak5481, 11 months ago

Katha lekhan in hindi on any topic

Answers

Answered by swapnildhok59447
0

kashtache phad....

एक म्हातारा शेतकरी होता. त्याला पाच तरूण मुलं होती. पण ती आळशी होती. कष्ट करणे त्यांना अजिबात माहिती नव्हते. फक्त वडिलांच्या पैशांवर मजा मारणे एवढेच त्यांचे काम.

त्यांचे वडील मात्र फार कष्ट करत. मुलांच्या आळशीपणामुळे त्यांच्या मनात विचार यायचा, की आपण गेल्यानंतर यांचे काय होणार. त्यांचा संसार कसा उभा रहाणार ?

शेवटी त्यांना एक कल्पना सुचते. ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना बोलावतात व सांगतात की आपल्या पूर्वजांनी या शेतात सोन्यांच्या नाण्यांचा हंडा पुरला आहे. मी उद्या गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व ते धन काढून पाचही जणांत वाटून घ्या. दुसर्‍या दिवशी तो शेतकरी गावी गेल्यानंतर या पाच जणांनी सोन्याच्या हंड्यासाठी सर्व शेत खणून काढले.

पण त्यांना काही तो हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे खणले आहे तर येथे धांन्य पेरावे. म्हणून त्यांनी तेथे धांन्य पेरले. त्या हंगामात चांगला पाऊस पडला. त्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. ते त्यांनी बाजारात ‍विकले. त्यांना भरपूर धन मिळाले. परगावाहून जेव्हा त्यांचे वडील आले, तेव्हा या पाच मुलांनी ते गेल्यानंतर काय झाले ते सांगितले.

तेव्हा ते म्हणाले, 'मी तुम्हाला ज्या धनाची गोष्ट करत होतो ते हेच धन. जर तुम्ही अशीच मेहनत दररोज केलीत, तर तुम्हाल दरवर्षी असे धन मिळेल.

उपदेश- कष्टाचे फळ गोड असते.

Similar questions