India Languages, asked by zagade, 1 year ago

Katha lekhan on गाढव - मीठ ' नदी - कापूस ​

Answers

Answered by shinchan8796
92

तुकाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी तुकाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. 

मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले. 

त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. 

मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच तुकारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. 

ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. 

त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही. 

उपदेश ः कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट

Answered by kunjandhande
16

Answer:

Explanation:

Similar questions