Geography, asked by rajesshmane032, 5 hours ago

खंडान्त उतार कोणत्या स्वरूपाचा असतो​

Answers

Answered by keerthanakrishna59
6

महासागराच्या पाण्याखालील भूकवचाच्या खंडीय क्षेत्राचे किनार्‍यापासून खंड-फळी, खंडान्त उतार व खंडीय उंचवटा हे तीन भाग करतात. सागरमग्न खंडभूमीच्या काठापासून तेखंडीय उंचवट्यापर्यंतच्या खंडाच्या काठाच्या उतरत्या भागाला खंडान्त उतार म्हणतात. खंड-फळीचा काठ ते अगाधीय मैदान यांच्या दरम्यानचा हा उतार असून तो १०० ते १,२०० मी. खोलीवरील महासागराच्या द्रोणीपर्यंत खाली गेलेला असतो. पृथ्वीवरील खंडान्त उताराची एकूण लांबी सुमारे ३ लाख किमी. आहे. खंड-फळी व खंडीय उंचवटा यांच्या तुलनेत खंडान्त उतार अधिक तीव्र असतो. खंडान्त उताराचे सरासरी प्रमाण म्हणजे ढाळमान (प्रवणता) ४.५० असून त्याचा पल्ला मात्र २ अंशापेक्षा कमी ते ४० अंशांहून अधिक असू शकतो. खंडान्त उताराची किमान प्रणवता मुख्य नद्या नसणार्‍या स्थिर किनार्‍यासमोरील भागांत, तर कमाल प्रवणता तरुण पर्वतश्रेणी व अरुंद खंड-फळी यांच्या समोरील किनारी भागांत असते. पॅसिफिक महासागरातील बहुतेक खंडान्त उतार अटलांटिक महासागरातील खंडान्त उतारापेक्षा अधिक तीव्र आहे; तर हिंदी महासागरातील खंडान्त उताराचे मान सर्वाधिक सपाट प्रकारचे आहे. जवळजवळ निम्मे खंडान्त उतार खोल सागरी खंदकांत किंवा अधिक उथळ खळग्यांत उतरत गेलेले आहेत

hope it helps you

mark as brainest and follow

Similar questions