खोड वनसंपत्तीला वर उचलते कारण
Answers
खोड : बी रुजल्यानंतर त्यातून येणारा टोकदार मोड (आदिमूळ) जमिनीत वाढून त्यापासून मूल तंत्र (मूल संस्था) बनते आणि मोडाच्या विरुद्ध टोकास असलेल्या सूक्ष्म भागाची (आदिकोरक) वाढ जमिनीच्या वर होऊन त्यापासून पुढे खोड, फांद्या (असल्यास), पाने इत्यादींचे प्ररोह तंत्र बनते. फांद्या, पाने, फुले, फळे इत्यादींना आधारभूत असा जो कणखर स्तंभ असतो त्याला खोड (क्षोड) अशी संज्ञा आहे यालाच वनस्पतीचा मुख्य आस (अक्ष) मानतात. या दृष्टीने फांद्या उपाक्ष ठरतात आणि अक्ष व उपाक्ष मिळून अक्ष तंत्र बनते. कांदा, सुरण, बटाटा व हरळी यांच्या जमिनीत वाढणाऱ्या खोडांचे अपवाद वगळल्यास खोड नेहमी वर हवेत प्रकाशाकडे कमी जास्त उंच वाढते आणि पानांना व फुलांना भरुपूर प्रकाश आणि त्यांच्या वाढीला व कार्याला अनुकूल परिस्थिती मिळावी अशा प्रकारे आधार देते शिवाय ते त्यांना जमिनीतील मुळांच्या द्वारे शोषलेली लवणे व पाणी उपलब्ध करून देते आणि पानांत बनलेले अन्न मुळांना व इतर अवयवांना पुरवते.