------खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.रामपूर गावामध्ये सोहनलाल नावाचा एक सावकार राहत होता. तो अतिशय लोभी होता. सोन्याची तर त्याला विशेष आवड होती.- एक दिवशी गावात एका साधूचे प्रवचन होते. प्रवचनात साधुमहाराजांनी सांगितले की, "आपण जर मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर आपल्या ।सर्व इच्छा पूर्ण करतो." सोहनलाल हे ऐकून खूपच खूष झाला. त्या दिवसापासूनच परमेश्वराची भक्ती करू लागला. दिवस रात्र अगदी मनापासून परमेश्वराच्याभक्तीत तो रंगून जाऊ लागला असे बरेच दिवस निघून गेले..------------------------
Answers
।। कथा लेखन ।।
।। लोभी माणूस ।।
रामपूर गावामध्ये सोहनलाल नावाचा एक सावकार राहत होता. तो अतिशय लोभी होता. सोन्याची तर त्याला विशेष आवड होती.
(एके दिवशी गावात एका साधूचे प्रवचन होते. प्रवचनात साधुमहाराजांनी सांगितले की, “आपण जर मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो.'' सोहनलाल हे ऐकून खूपच खूष झाला. त्या दिवसापासूनच परमेश्वराची भक्ती करू लागला. दिवस रात्र अगदी मनापासून परमेश्वराच्या भक्तीत तो रंगून जाऊ लागला असे बरेच दिवस निघून गेले.
याची भकती पाहून एके दिवशी परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. परमेश्वराने त्याला दर्शन दिले आणि सांगितले, '“माग तुला काय हवे ते ?'' परमेश्वराचे हे शब्द ऐकताच सोहनलालचा लोभीपणा जागृत झाला. आणि तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्या झोळीत भरपूर सोन्याची नाणी टाक”'. परमेश्वराने त्याची मागणी मान्य करताना त्यास सांगितले, “नाणी जर जमिनीवर पडली तर त्याची माती होईल.” लोभीपणामुळे सोहनलालने त्याकडे लक्ष दिले नाही.
परमेश्वर सोहनलालच्या झोळीत सोन्याची नाणी टाकू लागला. हळूहळू संपूर्ण झोळी सोन्याच्या नाण्यांनी भरून गेली. तरीही सोहनलाल देवाला “मला अजून सोन्याची नाणी दे', असे सांगत होता आणि अचानक सोन्याची नाणी झोळीत जास्त झाल्याने झोळी फाटली आणि सर्व नाणी जमिनीवर पडून त्यांची माती झाली. हे पाहताच सोहनलालला अतिशय दु:ख झाले आणि त्याचवेळेला परमेश्वरही अंतर्धान पावले.