(१) खालील कृती करा
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
Answers
(१) खालील कृती करा
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
उत्तर :-
सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून इंग्रजी विषयात एम. ए . हि [पदवी मिळवली. पुढे त्यांनी बी.एड. हि पदवीसुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सबइन्स्पेक्टर या पदावर त्या दाखल झाल्या. सुरवातीच्या अडीच वर्षाच्या सेवेतील पहिल्या वर्षी त्यांनी सुरक्षा यंत्रणेत काम केले. पुढील दिड वर्षात विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या , चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक त्यांनी केली व या भरकटलेल्या ४३४ अल्पवयीन मुलामुलींना त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पहिले नाही तर त्यांनी समाजकार्य म्हणून पहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. हे काम करीत असतांना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांनी याची फिकीर न करता आपले समाजसेवेचे काम चालू ठेवले.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वीरांगना"" या पाठातील आहे.
★ रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य.
शिक्षण-
रेखा मिश्रा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम. ए. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी बी. एड. ही पदवीसुद्धा घेतली आणि रेल्वे पोलीस बोर्डाचा प्रवेश परीक्षा देऊन सबइनस्पेक्टर या पदावर दाखल झाल्या.
कार्य-
१. श्रीमती रेखा मिश्रा यांनी पहिल्या वर्षात महिला सुरक्षा यंत्रणेत काम केले. दीड वर्षात भरकटलेल्या ४३४ अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
२. पत्ता चुकलेली मुले, कामाच्या शोधत आलेली मुले किंवा समाजकंटकांनी फसवून पळवून आणलेली मुले अशांना त्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा वळणावर आणण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले.
धन्यवाद...
"
Explanation: