India Languages, asked by Shoaeeb2486, 1 year ago

(८) खालील कृती सोडवा.
(अ) आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
(१) वरील उदाहरणातील अलंकार-
(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) ............. (ii) ...............
(अा) लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासि अंकुशाचा मार ।
(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी-(i) ............. (ii) ...............
(२) वरील उदाहरणातील अलंकार-
(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) ............. (ii) ...............
(इ) संसार सागरी विहरे जीवन नौका
(१) वरील उदाहरणातील उपमेये- (i) ............. (ii) ...............
(२) वरील उदाहरणातील उपमाने- (i) ............. (ii) ...............
(३) वरील उदाहरणातील अलंकार- (i) .............
(ई) खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.
सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो ।
त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी लोपतो ।।
उपमेय उपमान अलंकाराचे नाव अलंकाराची वैशिष्ट्ये
............. ............. ............. .............
............. ............. ............. .............
............. ............. ............. .............
............. ............. ............. .............

Answers

Answered by ksk6100
16

(८) खालील कृती सोडवा.  

उत्तर :- खालीलप्रमाणे ,

(अ) आला हा दारि उभा वसंत फेरीवाला

पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

(१) वरील उदाहरणातील अलंकार- चेतनगुणोक्ती  

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे.  (ii) वसंत ऋतूला फेरीवाला असे संबोधिले आहे.  

(अा) लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।

ऐरावत रत्न थोर । त्यासि अंकुशाचा मार ।

(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी-(i) मुंगी  (ii) ऐरावत  

(२) वरील उदाहरणातील अलंकार- दृष्टांत अलंकार  

(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) नम्रता या गुणांची माहिती सांगितली आहे.  (ii) एखादा विचार पटवून देतांना त्याच अर्थाची सामान उदाहरणे दिली आहे.  

(इ) संसार सागरी विहरे जीवन नौका

(१) वरील उदाहरणातील उपमेये- (i) संसार  (ii) जीवन  

(२) वरील उदाहरणातील उपमाने- (i) सागर (ii) नौका  

(३) वरील उदाहरणातील अलंकार- (i) रूपक  

(ई) खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो ।

त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी लोपतो ।।

उपमेय :- सावळा रामचंद्र                  

उपमान :-   चंद्र .  

अलंकाराचे नाव :- व्यतिरेक  

अलंकाराची वैशिष्ट्ये :- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते.

Answered by TransitionState
12

Answer:

"नमस्कार मित्रा,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""निर्णय"" या पाठातील आहे. लेखक डॉ. सुनील विभूते यांनी परिस्थिती बुद्धीने व नीट समजवून घेण्याची क्षमता माणसातच असते, अशी क्षमता यंत्रमानवात असू शकत नाही असा संदेश या पाठातुन दिला आहे.

★ खालील कृती सोडवा.

(अ)

(१) वरील उदाहरणातील अलंकार- चेतनगुणोक्ती

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे. (ii) वसंत ऋतूला फेरीवाला असे संबोधिले आहे.

(अा)

(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी-(i) मुंगी  (ii) ऐरावत हा हत्ती

(२) वरील उदाहरणातील अलंकार- दृष्टांत अलंकार

(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) नम्रता या गुणाची महती सांगितली आहे. (ii) एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत.

(इ) संसार सागरी विहरे जीवन नौका

(१) वरील उदाहरणातील उपमेये- (i) संसार  (ii) जीवन

(२) वरील उदाहरणातील उपमाने- (i) सागर (ii) नौका

(३) वरील उदाहरणातील अलंकार- (i) रूपक

(ई) उपमेय- सावळा रामचंद्र

उपमान- चंद्र

अलंकाराचे नाव- व्यतिरेक

अलंकाराची वैशिष्ट्ये- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते.

धन्यवाद...

"

Explanation:

Similar questions