Hindi, asked by vishwakarmadisha8c57, 1 day ago

खालील कथा पूर्ण करा.
मुददे-आंतरशालेय क्रीडा स्वर्या- द्यावव्याची स्या... -- शाळेतफे वरदचा सहमाग - - - वरद उत्तम धावपटू . सराव- उत्तम धावपटू तनयरी स्पों ---- प्रत्यक्ष स्वी---- चुरीची स्या, अचानक तनयचा पाय मुरगळणे स्पयो साइन वरदये मरतीला यावणे ---- तात्पर्य - वरदचे कौतुक​

Answers

Answered by himab8420
3

Answer:

••••••••••माणुसकीची शिकवण•••••••••••

त्यादिवशी वरद घरी आला तो उड्या मारतच. त्यांच्या जिल्ह्यामध्ये लवकरच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होणार होती. क्रिडास्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा होती. वरद हा एक उत्तम धावपटू असल्यामुळे शाळेतर्फे वरदने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असं मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. वरदने दुसऱ्या दिवशीपासूनच स्पर्धेचा सराव सुरू केला.

वरदच्या घराजवळ राहणारा तनय हादेखील उत्तम धावपटू होता आणि तोही त्याच्या शाळेमधून आंतरशालेय क्रीडास्पर्धेमध्ये भाग घेणार होता. आपण तनयला नक्कीच हरवू आणि पहिला क्रमांक मिळवू असा वरदला आत्मविश्वास होता आणि त्यासाठी तो भरपूर मेहनतही करत होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. वरद, तनय आणि आणखी दोन मुलांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा होती. वरद जीव तोडून धावत होता आणि अचानक तनयचा पाय मुरगळला. तनय मटकन खाली बसला. वरदच्या हे लक्षात आलं. मागचापुढचा विचार न करता त्याने स्पर्धा सोडून तनयकडे धाव घेतली. त्याला उठायला मदत केली आणि हळूहळू आधार देऊन धावपट्टीच्या बाजूला असलेल्या एकाबाकावर बसवलं. तनयचे शिक्षक आणि क्रीडास्पर्धेचे आयोजक हे सगळं बघत होते. तनयचे शिक्षकही धावत मदतीला आले.

तनय आणि वरद दोघेही स्पर्धेतून बाद झाले आणि दुसरा एक मुलगा स्पर्धा जिंकाला. आपण जिंकू शकलो नाही या विचारांनी वरदच्या डोळयामध्ये पाणी आलं; पण तेवढ्यात अचानक त्याच्या नावाचा पुकारा झाला. स्पर्धेचे आयोजक बोलत होते, या धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस एका धावपटूने मिळवले असले, तरी या संपूर्ण क्रीडास्पर्धेमध्ये अव्वल ठरलेला एक खेळाडू म्हणून आज मी वरदचं नाव घोषित करतो. स्पर्धेपेक्षा देखील माणुसकी महत्वाची असते ही एका अतिशय महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला वरदने शिकवली. आयोजकांचे शब्द संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धा हरल्याचं दुःख वरद विसरला. स्पर्धा जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुसऱ्याची मदत करण्यातला आनंद मोठा आहे हे आज त्यालाही उमगलं होतं.

तात्पर्य : माणुसकीचा विचार करून एकमेकांना मदत करणे हा सर्वांत मोठा गुण आहे.

Explanation:

Hope it helps .. pls mark me as brainliest..

Similar questions