(२) खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""आजी : कुटुंबाचं आगळ"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात आजी ही जेष्ठ व्यक्ती आहे. या पाठात आजीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या दिसून येतात. तसेच एकत्र कुटुंबपद्धतीचे मनोरम दर्शन घडते.
★ आजीचे शब्दचित्र.
1. आजीचे दिसणे-
आजीची उंची साडेपाच फूट इतकी होती. तिचा वर्ण गोरा होता. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात म्हणून त्यांना काठीच्या आधारे चालावे लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती.
2. आजीची शिस्त-
आजी कडक शिस्तिची होती. प्रत्येकाला आपली कामे स्वतः करता आली पाहिजे असा आजीचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. दुपारच्या कामांचे नियोजन ही तिने केलेले असे.
3. आजीचे राहणीमान-
हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पोशाख होता. कपाळावरच गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावत असे. ती पायात जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.
धन्यवाद...
"