खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा .
अ)काळजात त्यांच्या भरली शहाळी .
आ) झणी धरणीला गलबत टेकवा .
Answers
Answer:
वरील ओळी कवी ग.दि. माडगूळकर यांच्या गोमू माहेरला जाते या अतिशय सुप्रसिद्ध अशा कवितेतील आहेत.
कवी म्हणतो नुकतेच लग्न झालेली एक कोकणातील मुलगी लग्न होऊन सासरी आलेली असते. लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच आपल्या नवर्याला घेऊन कोकणात आली असते. ती सर्वांना आपल्या नवऱ्याला कोकणाचे वैभव व सौंदर्य दाखवण्यासाठी सांगते.
काळजात त्यांच्या भरली शहाळी
या ओळीतुन कवी म्हणतो, कोकणातील माणसे अतिशय मृदू असतात, त्यांचे मन हे नारळासारखे नितळ असते. ते अतिशय साधे भोळे असून खूप प्रेमळ असतात.
झनी धरणीला गलबत टेकवा
या ओळीतुन कवी त्या नवविवाहीत तरुणीच्या मनातील भावना व्यक्त करतो. ती नवविवाहित तरुणी आपल्या माहेरला पोहोचण्यासाठी खूप आतुर झालेली असते आणि म्हणूनच ती त्या नाव चालवणाऱ्या नाखव्याला म्हणते,लवकरात लवकर ही होडी किनार्याला पोहोचवू दे आणि मला माझ्या माहेरला पोहचवूण माझ्या माणसांना भेटू दे.
Answer:
थातडूथढथथडा यढीदठदख रृडथ