India Languages, asked by kawtharshafa9741, 1 year ago

खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा. ..........................
(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली. ..........................
(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने. ..........................

Answers

Answered by anu2655
24
अ) उन्हाळा जितका तीव्र, तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
आ) आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसुला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.
इ) चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.





धन्यवाद
Answered by gadakhsanket
19

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "मातीची सावली" या पाठातील आहे. या पाठाची लेखक स्टॅनली गोनसाल्विस आहेत. या पाठात मातीवर प्रेम करणाऱ्या फरसुच्या मनातील वेगवेगळ्या भावनांचे वर्णन केले आहे.हि कथा मालवणी भाषेत लिहिलेली आहे.

खालील ओळींतील संकल्पना

(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.

उत्तर-दारातच असलेले चिंचेचे झाड.

(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.

उत्तर- जुनं झाड दारातच असल्याने आईच्या मायेसारखी चिंचेची सावली.

(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.

उत्तर-चिंचेची लहान पान वाऱ्याने उडून फुलपाखरसारखी खाली भिरभिरत येतात.

धन्यवाद...

Similar questions