खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) पटकुर पसरु नको.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नकाे.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरुळ.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "आपुले जगणे...आपुली ओळख!" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी संदीप खरे हे आहेत. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये, याविषयी भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे. सदर कविता 'अग्गोबाई ढग्गोबाई' या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
◆ खालील शब्दसमूहांचा अर्थ.
(अ) पटकुर पसरु नको. - आपले चारित्र्य शुद्ध असावे. त्यात पावित्र्य असावे. स्वतः होऊन घाणेरडे वस्त्र म्हणजे पटकुर पसरू नको. म्हणजे कोणतेही गलिच्छ काम करू नकोस.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नकाे. - दुसऱ्याबाबत तुझ्या मनामध्ये संवेदनशीलता असावी. कोरडेपणा म्हणजे संवेदनशून्य राहू नये. दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्या मनाला पाझर फुटावा.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरुळ. - वेरुळमध्ये पाषाणात अप्रतिम लेणी कोरलेल्या आहेत. त्या अजरामर आहेत. अशाच प्रकारे अप्रतिम व अजरामर कर्तृत्व तू घडव.
धन्यवाद...