खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट करा.
(१) पांघरू आभाळ- .........................
(२) वांदार नळीचे- .........................
(३) आभाळ पेलीत- .........................
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "वनवासी" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत. वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यांतील जीवन, निसर्ग, निसर्गविषयीचे प्रेम त्यातील अतूट नाते यांचे वर्णन या कवितेतून कवीने केले आहे. 'वळीव' या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता घेतली आहे.
★ खालील शब्दसमूहांतील अर्थ.
(१) पांघरू आभाळ- ही कविता निसर्ग कविता असल्याने निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या वनवासी मुलांचे वर्णन कवी करतात. निसर्ग जवळून पाहणारी ही मुले रानावनात भटकणारे असतात. त्यांना झोपण्यासाठी गादी लागत नाही. ते उघड्यावर झोपतात आणि आकाशाचे पांघरून पांघरतात.
(२) वांदार नळीचे- माकडाप्रमाणे उघड्या मोकळ्या रानावनात उड्या मारणारी मुले खरोखरच माकडाप्रमाने उड्या मारतात. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. त्यांच्या कृतीला कवी वांदार नळीचे म्हणतात.
(३) आभाळ पेलीत- रानावनात राहणाऱ्या वनावासींना कसलीच भीती वाटत नाही. उलट निसर्गाच्या सानिध्यात ते मजेत मोकळ्याप्रमाणे वावरतात. डोक्यावर असणारे आभाळ जणू काही आम्ही आमच्या डोक्यावरच घेतले आहे. ते पेलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे.
धन्यवाद...