खालील विषयांवर ब्लॉग लिहा.
(अ) महाविद्यालयातील पहिला दिवस
Answers
नमस्कार ! आज ब्लॉग लिहिण्याची पहिली वेळ. तशी आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हि त्या त्या योग्य वेळेस अनुसरून असते .मी या सुरुवातीच्या माझ्या ब्लॉग लिहण्याच्या विचारात असताना सुरुवात नक्की कुठून करावी हेच मुळात कळत नव्हतं . तेव्हा एक गोष्ट सुचली कि, ज्यामुळे आपण ब्लॉग लिहिण्यास प्रवृत्त झालो अश्या गोष्टीने सुरुवात केली तर काय हरकत आहे. आणि म्हणूनच माझं हे पहिलं लिखाण म्हणजेच, माझं माध्यम क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी असणारं कॉलेज मधलं पहिलं पाऊल. "अर्थातच माझा कॉलेजचा पहिला दिवस"
कॉलेज म्हंटलं की मजा -मस्तीच्या फुलपाखरांना हवेत झेपावण्याचं ठिकाण,प्रत्येक जण कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी खूप आतुर असतो अर्थात मी देखील होतो पण इतरांपेक्षा अधिक. कारणही तसच होतं . अगोदर फर्स्ट ईअर आणि सेकण्ड ईअर सायन्स करून झालं आणि थर्ड ईअर सायन्सला प्रवेश घ्यायचा होता परंतु रसायानांबरोबर खेळणं मनाला पटत नव्हतं,म्हणून अखेर घरच्यांना सविस्तरपणे समजावून मग घरच्यांनी मला आवडणाऱ्या या नवीन माध्यम क्षेत्रातील शाखेत दाखल होण्यासाठी अंतिमतः परवानगी दिली आणि प्रवेश प्रक्रिया विना अडचण मी पार पाडली .
आज कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेजची वेळ काही ठरली नव्हती ; तशी ती ठरलेली होती,पण मला नक्की माहित नव्हती म्हणून मुद्दामून पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून सकाळी ७.२० ला घरातून बाहेर पडलो. कॉलेजमध्ये आल्यावर पहिल्यांदातर वर्ग शोधायची माझी धांदल सुरु झाली . नव्या बाई नवा वर्ग असं लहानपणी म्हणणं फार छान वाटायचं, कारण त्यावेळी शिक्षक स्वतः वर्गात आणून बसवायचे, कारण तेव्हा लहानपणी वर्ग माहित नसायचा . पण आत्ताचं चित्र हे फारच वेगळं आहे, परुंतु आता कॉलेजमध्ये आल्यानंतर मात्र आम्हाला शिक्षकांना शोधावं लागतं. माझ्या कॉलेजच्या या पहिल्या दिवशी अगदी तसच झालं, नवा वर्ग कोणता हे शोधण्यासाठी कॉलेजचे दोन मजले चढणे व उतरणे अशी आमची प्रक्रिया चालू होती. अनावधानाने एका वर्गात जाऊन देखील बसलो परंतु पुढल्या बाकावरच्या मुलाकडून कळले कि हा तर थर्ड ईअर कॉमर्स चा वर्ग .तेव्हा आपली चांगलीच फजिती झाली आहे हि बाब मनात घेऊन सरळ वर्गा बाहेर पडलो, शेवटी एका शिपाई काकांना विचारूनच टाकले कि फर्स्ट ईअर मास मिडिया मराठी विभागाचा वर्ग कुठे आहे ! तेव्हा काका म्हणाले की ' हा वर्ग तर दुपारी १ वाजता आहे.' अश्या तऱ्हेने सकाळी ७.३० ते १०.३० हा वेळ फक्त वर्ग शोधण्याच्या धावपळीत घालवला असताना नंतर कळते कि, कॉलेज हे दुपारी १ वाजता आहे. तेव्हा हताश झालेला हा चेहरा पहिल्या दिवसाच्या उत्सुकतेत असताना फक्त १ वाजण्याच्या घड्याळ्यातल्या काट्यानकडेच टक लावून वाट पाहण्यास बांधील राहिला. त्यावेळी आमच्या मनातल्या फुलपाखरांचा थवा हवेत उडण्याआधीच शांत झोपून गेला आणि असा हा आमचा कॉलेजचा पहिला दिवस आठवणीतल्या कक्षेत सामावून गेला .
नमस्कार मित्रांनो. हा माझा "महाविद्यालयातील पहिला दिवस" या विषयावरील ब्लॉग आहे.
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. महाविद्यालयात जाणे आणि उच्च शिक्षण घेणे हे माझे ध्येय होते. मी भावनांनी भरून गेलो होतो कारण या स्तरावर माझी पहिलीच वेळ होती आणि माझ्या स्वतःच्या शाळेसाठी पैसे देण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्या दिवशी, मी काय कपडे घालणार आहे ते वर्ग क्रमांक आणि मजला शोधण्यापर्यंत माझ्या मनात बरेच काही होते. तो दिवस नवीन अनुभवांनी भरलेला होता. त्यावेळी मी 28 वर्षांचा होतो. मी याआधी असा वर्ग कधीच घेतला नव्हता आणि ती माझ्या सवयीपेक्षा पूर्णपणे वेगळी रचना होती. ते, मी तर्क केला, की भविष्यात इतर वर्गांमध्ये मला मदत होईल.
दुसरीकडे, माझ्या पहिल्या दिवसातील सर्वात अविस्मरणीय पैलूंपैकी एक म्हणजे वैविध्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागतिक वर्गाचा एक भाग असणे, व्यतिरिक्त एक मनोरंजक इंग्रजी वर्गात असणे. मी त्याचा संदर्भ असाच देतो कारण ती माझी सुरुवातीची छाप होती. इतर कोणत्याही नवोदितांप्रमाणे, मी माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी उत्साही होतो. त्याच वेळी, मी चिंताग्रस्त, आनंदी आणि उत्साही होतो. ती विचित्र भावना आपल्या सर्वांना आहे पण आपली बोटे लावू शकत नाही. मी पंधरवड्यापूर्वी कॉलेजची तयारी सुरू केली.
कॉलेजमधली माझी तीन वर्षे खूप लवकर गेली. आजही मला ते दिवस खूप आठवतात. पण ते माझ्या आठवणींमध्ये जिवंत आहेत आणि आता मी एक शिक्षक आहे, मी हे सर्व नवीन विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयीन करिअरची सुरुवात करताना पाहतो. मी माझ्या महाविद्यालयीन दिवसांसाठी नॉस्टॅल्जिक आहे आणि त्यांचा खजिना आहे.