Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हांला गतीची जाणीव होते? गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल?
1. पक्ष्या चे उडणे.
2. थांबलेली रेल्वे गाडी.3. हवेतून उडणारा पालापाचोळा
4. डोंगरावरती स्थिर असलेला दगड

Answers

Answered by ajaybh3103
1

गती म्हणजे एखाद्या वस्तुची काळानुसार होणारी हालचाल. मग त्या हालचालीचा वेग, दिशा ह्या गोष्टी देखील गतीवर अवलंबून असतात. गती असणे म्हणजे ती वस्तु अथवा गोष्ट जसा जसा वेळ निघून जाईल तशी त्या  वस्तु अथवा गोष्टीची मूळ जागा बदलत जाईल. वरील उदाहरणातून आपण गती असणे किवा  गती नसणे  हे समजून घेऊ.

उदा. : पक्ष्याचे उडणे

पक्ष्याचे उडणे  हे गती असण्याचे उदाहरण आहे . कारण पक्षी उडण्याच्या क्रियेत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात आहे आणि जसा जसा वेळ जात आहे तशी पक्ष्याचे मूळ ठिकाण बदलत आहे. तसेच त्याचा वेग आणि दिशा देखील गतीवर अवलंबून आहे.

उदा. थांबलेली रेल्वे गाडी

थांबलेली  रेल्वे  गाडी हे गती नसणे याचे उदाहरण आहे. कारण रेल्वे गाडी ही थांबलेल्या स्थितीत म्हणजेच स्थिर आहे. जसा जसा वेळ निघून जाईल तरी सुद्धा गाडीची आरंभ ठिकाण तेच राहील. थांबलेल्या अवस्थेत तिचा वेगाशी संबंध जोडला जाऊ शकत नाही

उदा ;हवेतून उडणारा पालापाचोळा

हवेतून उडणारा पालापाचोळा हे देखील गती असण्याचे उदाहरण आहे.कारण हवेमुळे पाला पाचोळ्याची जागा बदलत आहे मात्र त्याची दिशा आणि वेग हवेच्या गतीवर अवलंबून आहे.

उदा.डोंगरावरती स्थिर असलेला दगड

स्थिर असलेल्या  डोंगरावरच्या दगडावर गती नाही आहे कारण त्याची हालचाल होत नाही तो स्थिर आहे जर कुणी त्याला धक्का दिला तर त्याला गती मिळेल आणि त्याची हालचाल होईल .

Answered by gadakhsanket
0
★उत्तर - एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात.यावरून

1) पक्ष्याचे उडणे.
हे उदाहरण गती असने यामध्ये मोडते.कारण पक्षी उडतो तेव्हा त्याची जागा बदलत असते.पक्षी गतिमान आहे.

२)थांबलेली रेल्वे गाडी.
हे उदाहरणात रेल्वेगाडीला गती नसते;कारण रेल्वेगाडी एका जागेवर थांबलेली आहे ती स्थिर आहे.ती तिची जागा बदलत नाही म्हणून तिला गती नाही.

३)हवेतून उडणारा पालापाचोळा.
या उदाहरणात गती आहे; कारण- हवेतून उडणारा पालापाचोळा त्याची जागा बदलत असतो. म्हणून तो गतिमान आहे.

४)डोंगरावरती स्थिर असलेला दगड .
या उदाहरणात दगडाला गती नाही. कारण तो स्थिर आहे तो त्याची जागा बदलत नाही.म्हणून त्याला गती नाही.

धन्यवाद...
Similar questions