India Languages, asked by Romiparwe, 8 months ago


खाली दिलेल्या वाक्यातील अघारेखित नामाचे प्रकार ओळखा
i)मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
4

Answer:

Explanation:

हा लेख मराठी व्याकरण याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्याकरण.

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करणे) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

मराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटातील भाषा आहे.

मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नियमांची भर पडली.

इतिहास

मराठी भाषेचे व्याकरण हे आधुनिक इंडो आर्यन भाषांशी साधर्म्य दाखवते. हिंदी, गुजराती, पंजाबी या त्या भाषा आहेत. आधुनिक मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम केरी यांनी इंग्रजी भाषिक गटासाठी इ.स. १८०५ मध्ये प्रकाशित केले.

मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले असते. नाम हे पुल्लिंग, स्रीलिंग, नपुंसकलिंग या तीन प्रकारांमध्ये असते. संख्या या एकवचनात वा अनेकवचनांत दर्शविल्या जातात, तर विभक्ती या कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, साधन, स्थान आणि संबोधन यांसाठी योजल्या जातात, (प्रथमा ते संबोधन). मराठी भाषेने संस्कृत भाषेतील नपुंसकलिंगाचा वापर कायम ठेवला आहे, ज्यामुळे अन्य इंडो आर्यभाषांपासून मराठीचे वेगळेपण सिद्ध होते. मराठी क्रियापदे ही वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ आदि काळ दर्शवितात. क्रियापदे त्यांच्या कर्त्याशी सुसंगत होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी सुसंगत होऊन कर्मणि प्रयोग यांची रचना होते.[१][२]

संस्कृतचा प्रभाव

मराठी भाषाशास्त्रावर संस्कृत भाषेतील तत्सम शब्दांचा प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेत तत्सम शब्दाच्या वाप्रासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम मराठी भाषेत हे शब्द वापरताना लागू होतात. संस्कृत भाषेतील समृद्ध शब्दसंपदा या शब्दांच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेली अहे. आधुनिक तांत्रिक परिभाषेसाठीसुद्धा हे शब्द लागू पडतात.

मराठी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अन्य इंडो-युरोपियन भाषांच्या तुलनेत मराठीमध्ये फारसी, द्राविडी, राजस्थानी आणि गुजराथी भाषांतील शब्दांचा अधिक समावेश होतो..

प्रसिद्ध मराठी व्याकरणकार

मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला.

नाम

नाम – सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत

सामान्य नाम

विशेष नाम

भाववाचक नामौ A. सामान्य नाम – ज्या नामाच्या योगाने जाती किंवा गटाचा बोध होत असेल त्यास सामान्य नाम म्हणतात.

उदा० – मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव इत्यादी.

सामान्य नामाचे २ प्रकार :

1. पदार्थ वाचक – जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात

उदा० – दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी

2. समूह वाचक – ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात .

उदा – मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

B. विशेष नाम – ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.

उदा० – शिवाजी, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी, इत्यादी.

( टीप – विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा – सागर)

C. भाववाचक नाम/धर्म वाचक नाम – ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात.

उदा – गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा, इत्यादी.

भाववाचक नामाचे ३ प्रकार

1) गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई

2) स्थितिदर्शक – गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य

3) कृतिदर्शक – चोरी, चळवळ, क्रांती

प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे

य : सुंदर – सौंदर्य, गंभीर – गांभीर्य, शूर – शौर्य, नवीन – नावीन्य

त्व : शत्रू – शत्रुत्व, मित्र – मित्रत्व, प्रौढ – प्रौढत्व, नेता – नेतृत्व

पण / पणा : देव – देवपण, बाळ – बालपण, शहाणा – शहाणपण

ई : श्रीमंत – श्रीमंती, गरीब – गरिबी, गोड – गोडी

ता : नम्र – नम्रता, वीर – वीरता, बंधू – बंधुता

की : पाटील – पाटीलकी, माल – मालकी, गाव – गावकी

गिरी : गुलाम – गुलामगिरी, दादा – दादागिरी, फसवा – फसवेगिरी

वा : गोड – गोडवा, गार – गारवा, ओला – ओलावा

आई : नवल – नवलाई, चपळ – चपळाई, चतुर – चतुराई

वी : थोर – थोरवी

A. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :

आमच्या पोपट कालच गावाला गेला.

आत्ताच तो नगरहून आला.

आमची बेबी नववीत आहे.

B. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :

आमची बायको म्हणजे लक्ष्मी.

तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.

आईचे सोळा गुरुवारचा व्रत आहे.

नाम म्हणजे- एखाद्या गोष्टीचे नाव :-

C. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :

शांती माझ्या भावाची मुलगी आहे.

माधुरी सामना जिंकली.

विश्वास परीक्षेत पास झाला.

D. धातुसाधित नाम : धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधित नाम म्हणतात

त्याचे वागणे चांगले नाही.

ते पाहून मला रडू आले.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.

Answered by sonawanerajesh547
0

Answer:

Explanation:

Answer Is Manali

Similar questions