India Languages, asked by lataraika2003, 1 year ago

Khara nagrik kasa asava personal response

Answers

Answered by Dhanshri0
7

Answer:

भारतात अनेक कायदे आहेत आणि ते कायदे प्रत्येक भारतीय जाणतो हे गृहीतक न्यायव्यवस्था मानते. त्यामुळे न्याय करताना आरोपी नागरिकाला किंवा गुन्हा करणाऱ्याला कायदा हा माहित होता की नव्हता याचा विचार न्यायालय करीत नाही. अर्थात प्रत्येक कायदा हा प्रत्येकाला माहित असावा असे गृहीत धरणे अतर्क्य आहे पण शेवटी न्यायालयाला देखील काही मर्यादा आहेत.

भारतात कायदे सोडा पण बहुतांश नागरिकांना त्यांची मुलभूत कर्तव्येच माहित नाहीत. त्याचे ज्ञान जरी त्यांना मिळाले तरी देखील देश हा शिस्तबद्ध समाज निर्मितीकडे यशस्वीपणे वाटचाल करू शकतो.

ही मुलभूत कर्तव्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षणामध्ये समाविष्ट करून न्यायालयाच्या त्यासंबंधीच्या विविध निकालांच्या पार्श्वभूमीवर शिकवली जाणे ही काळाची गरज आहे. भारताला महासत्ता बनविण्यासाठीचे ते एक महत्वाचे आणि पाया रचणारे पाऊल ठरेल.

प्रजासत्ताकदिन हा लाऊडस्पीकर लावून, सत्यनारायणाची महापूजा ठेवून, फक्त ध्वजारोहण करून साजरा करण्यापेक्षा या नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांचा जागर करून साजरा करणे हा केव्हाही उत्तम पर्याय असेल.

भारतीय संविधानात ५१क ते ५१ट ही कलमे भारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये काय आहेत हे सांगतात. खरतर प्रत्येक भारतीयासाठी संविधानाची सुरुवात ही या कलमांपासून होते असे मानायला हरकत नसावी. भारतीय नागरिक कसा असावा, त्याची कृती कशी असावी, त्याचे विचार कसे असावेत हे या कलमांद्वारे स्पष्ट केले गेले आहे. या कलमातील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत.

See in comment box....

Answered by kazijarin1gmailcom
0

Explanation:

HOPE IT WILL HELP YOU

AND MARK ME AS BRAINLY

Attachments:
Similar questions