लिंग ओळखा १)रंग २)ऊन ३)खडक ४)काठ
Answers
Explanation:
रंग - पुल्लींग
ऊन - नपुंसकलिंग
खडक - पुल्लिंग
काठ - पुल्लिंग
- रंग -पुल्लिंगी
- ऊन- नपुसकलिंगी
- खडक-पुल्लिंगी
- काठ -पुल्लिंगी
Explanation:
मराठी भाषेत एकूण तीन लिंग आहेत.
पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी.
दिलेला हा शब्द हा स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे किंवा नपुसकलिंगी आहे मुलगी आहे हे ओळखण्यासाठी काही पद्धती आहेत.
जर एखादा शब्द बोलत असतांना त्या अगोदर तो हा शब्द वापरावा लागतो तर तो शब्द हा नेहमी पुल्लिंगी असतो.
उदारणार्थ -तो रस्ता, तो पर्वत, तो माणूस, तो वाघ.
जर एखादा शब्द बोलत असताना त्या अगोदर ती हा शब्द वापरावा लागतो तेव्हा तो शब्द हा नेहमी स्त्रीलिंगी असतो.
उदाहरणार्थ- ती मांजर, ती नदी, ती बाई.
जर एखादा शब्द बोलत असताना त्या अगोदर ते हा शब्द वापरावा लागतो तेव्हा तो शब्द हा नेहमी नपुसकलिंगी असतो.
उदाहरणार्थ- ते झाड, ते ऊन, ते रान , ते जंगल
वरील दिलेल्या उदाहरणात रंगाच्या अगोदर, खडका च्या अगोदर व काठा च्या अगोदर तो असे बोलावे लागते म्हणून वरील तिन्ही शब्द पुल्लिंगी आहेत. तर ऊन या शब्दाच्या अगोदर ते ऊन हा शब्द वापरावा लागतो म्हणून तो शब्द नपुसकलिंगी आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/47554872
https://brainly.in/question/27541693
#SPJ3