लाकूडचा चा उपयोग काय आहेत
Answers
लाकूड : वनस्पतींच्या साल व भेंड (नरम मध्यभाग) यांच्या दरम्यानच्या कठीण तंतुयुक्त भागाला लाकूड म्हणतात. लाकडाची अधिक नेमकी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. वनस्पतींच्या फांद्यांची, खोडांची व मुळांची लिग्निनयुक्त, जलवाहक, बळकटी देणारी व साठवण करणारी ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचे– पेशींचे–समूह). वनस्पतिवैज्ञानिक दृष्ट्या लाकडाला प्रकाष्ठ असे नाव असून त्याचे विवरण त्याच शीर्षकाच्या नोंदीत दिलेले आहे. लाकडाचे पृथक्करण केल्यास त्यामध्ये ५० ते ६०% सेल्युलोज, २० ते २५% लिग्निन आणि १०–२०% कार्बोहायड्रेटे व खनिज पदार्थ आढळतात. लाकूड ही एक अतिशय महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती असून काही थोड्याच पुनर्निर्मितिक्षम साधनसंपत्तीपैकी ती एक आहे.
प्राचीन काळी मानव प्रारंभी लाकडाचा उपयोग आपले घर बांधण्यासाठी व इंधन म्हणून करीत असे. त्यानंतर तो जलप्रवासासाठी लागणाऱ्या नौका, शेतीची अवजारे, वाहने, क्रीडासाहित्य, विविध कारखान्यांसाठी कच्चा माल, प्लायवुड, कागद वगैरे गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू लागला. औद्योगिक क्रांती व दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात लाकडाचा उपयोग अनेक क्षेत्रांत होऊ लागला व त्याची मागणी पण फार मोठ्या प्रमाणावर वाढली.
पृथ्वीचा सु. १/३ भूभाग जंगलव्याप्त आहे. भारतात. ६·९ लक्ष चौ. किमी. म्हणजे सु. २२% भूभाग जंगलव्याप्त आहे व त्यापैकी ७८% जंगले उत्पादक स्वरूपाची आहेत. भारतात साधारण ३,६०० प्रकारची झाडे अस्तित्वात असून त्यांपैकी फक्त २०० प्रकारच उपयोगी आहेत आणि फक्त काही झाडांचेच लाकूड (उदा., साग, देवदार, शिसवी इ.) चांगले टिकाऊ आहे. कापून चौरस आकार न दिलेल्या सालरहित लाकडाचे भारतात १९७० साली १७·०५ कोटी घ. मी. उत्पादन झाले. १९८५ मध्ये हे उत्पादन २४·५ कोटी घ. मी. झाले आणि त्यापैकी ९०·८% लाकूड इंधनाकरिता व कोळसा तयार करण्याकरिता, तर ९·२% औद्योगिक उपयोगाकरिता वापरण्यात आले.
यूरोपात स्वीडन, नॉर्वे व फिनलंड हे देश लाकडाकरिता प्रसिद्ध आहेत.तेथे मोठी जंगले असून त्यामध्ये पाइन, स्प्रूसस व बर्च या झाडांचे लाकूड मोठ्या प्रमाणावर होते व त्याची निर्यातपण होते. रशियाचा एक तृतीयांश भाग जंगलमय आहे. त्यामध्ये लार्च, पाइन, स्प्रूसस, बर्च आणि ॲस्पेन या झाडांची पैदास होते. कॅनडामध्ये पण पुष्कळ भाग जंगलमय असून त्यामध्ये स्प्रूस, बाल्सम फर, जॅकपाइन, व्हाइट पाइन व टॅमॅरॅक या जाती प्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत पॉप्लर, स्वीटगम, ट्युपेलो, बर्च, अँश, पाइन, सायप्रस ओक, हिकरी, वॉलनट (अक्रोड), बीच या मुख्य जाती आहेत. या देशात दरवर्षी जितकी झाडे तोडतात तितकी नवी झाडे लावण्याची वहिवाट आहे. आफ्रिकेतील मध्य भागात मोठी जंगले आहेत आणि त्यांमधील मॅहॉगनी व ओकोम या जाती प्रसिद्ध आहेत. भारतात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा इ. राज्यांत लाकडाच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात सागवान, अंजन,आंबा, बाभूळ, मोह, साल इ. जाती उपलब्ध आहेत.
प्रस्तुत नोंदीत लाकडाची सर्वसाधारण संरचना, वर्गीकरण, गुणधर्म, उत्तम लाकडाचे विनिर्देश (मूलभूत आवश्यक वैशिष्ट्ये), त्यावर करावयाच्या प्रक्रिया, परिरक्षण, कापकाम व लाकडापासून मिळणारे रासायनिक पदार्थ या गोष्टींचे विवरण केलेले आहे. लाकडाशी संबंधित असलेल्या ‘लाकडाचे बांधकाम’ व ‘सुतारकाम’ या विषयांवर तसेच त्यापासून बनविण्यात येणाऱ्या आगकाड्या, कागद, नौका, प्लायवुड, फर्निचर, लोणारी कोळसा इ. वस्तूंवर स्वतंत्र नोंदी आहेत.
संरचना : आ. १ मध्ये सर्वसाधारण झाडाच्या लाकडाची संरचना दर्शविणारा खोडाचा आडवा छेद दाखविला आहे. यामध्ये (१) ही बाह्य साल आहे हिच्यामुळे झाडाचे रक्षण होते. (२) ही अंतर्साल आहे. ही बाह्य सालीच्या
आत असते. ही साल झाडाच्या पानांमध्ये तयार होणारे अन्नरस फांद्यांना, खोडाला व मुळांना पुरविते. (३) हा ऊतककर स्तर आहे. हा स्तर सारखा वाढत असतो. प्रत्येक हंगामात या स्तराच्या आतील बाजूस नवीन लाकूड तयार होते व बाहेरच्या बाजूस नवीन साल तयार होते. (४) ही वार्षिक वा वृद्धी वलये आहेत. यांतील प्रत्येक वलय म्हणजे एक वर्षातील (हंगामातील) वाढ असते. (५) हे रसकाष्ठ आहे. या भागातून झाडाच्या मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेली पोषक द्रव्ये पानांपर्यंत पोहोचविली जातात.
Hope it helps you