लोकमान्य टिळकांवर निबंध लिहा
Answers
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करते.
‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.”, असे ब्रीद वाक्य ज्यांनी आपल्या भारतीयांना दिले असे थोर स्वातंत्र्य सेनानी, संपादक, लेखक, राजकारणी, तत्वज्ञानी म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. बाळगंगाधर टिळकाचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे आहे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हयात झाला. त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्यांचे शिक्षक त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणत असे. टिळक लहानूपणापासूनच अत्यंत हुशार होते, गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांचे दहावीच्या पुढील शिक्षण पुणे येथून झाले. त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल झाली होती. लो. टिळकांनी ‘मराठा’ आणि ‘केसरी’ असे दोन वर्तमानपत्र काढले. त्यांनी लोकांवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडली, गणेशोत्सवाची सुरवात केली, इंग्रजांविरूद्ध बंड पुकारले. अशा या थोर नेत्यांवर 1906 मध्ये राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा तुरंगवास भोगत असतांना त्यांनी ‘गीतारहस्य’ हे पुस्तक लिहिले. अशा या महान नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 मध्ये निर्वाण झाले. अशा या थोर लोकमान्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जयहिंद !