शिक्षक दीनांवर निबंध लिहा
Answers
मंचावर उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार.
आज आहे 5 सप्टेंबर, या दिवसाचे खास महत्व म्हणजे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ञ डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. आपल्या भारत देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्व मान्यवर शिक्षकांचा वंदन दिवस आहे. म्हणजेच आपल्याला अज्ञानातून ज्ञानात प्रवेशित करणाऱ्या आपल्या शिक्षकांचा गुणगौरव करण्याचा दिवस. शिक्षक हे आपल्या ज्ञानाचा विकास करतात, कौश्यलाची पातळी वाढवतात, आपल्या आत्मविश्वास निर्माण करतात. यश संपादन करण्याचा योग्य मार्ग दाखवतात म्हणूनच आपण म्हणतो, शिक्षक हे देवाचे पृथ्वीरूपी अवतार आहे.
‘‘गुरूर्र ब्रम्हा गुरूर्र विष्णुः गुरूर्र देवो महेश्वरः
गुरूर्र साक्षात परब्रम्ह तस्मैश्री गुरूवे नमः”
तसेच हा दिवस डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची संपूर्ण जगाला ओळख करून दिली. राधाकृष्णन यांचे कार्य व शिक्षकांवर प्रेम पाहूनच आपल्या भारत देशात हा दिवस शिक्षक दिवस म्हणून ओळखला जावू लागला.