History, asked by khardesantosh80, 4 months ago

लोकशाही मध्ये चळवळींना फार महत्त्व का असते???​

Answers

Answered by gap740607
3

Answer:

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते , कारण चळवळ म्हणजे एखादी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कृतिशील राहून व लोकांना संघटित करून सरकारवर दबाव आणला जातो . चळवळींमध्ये खंबीर नेतृत्त्वाची गरज असते . आपल्या भारतात वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय चळवळी आहेत . जसे कि , आदिवासी चळवळ , शेतकरी चळवळ , कामगार चळवळ , स्त्री - चळवळ , पर्यावरण चळवळ , ग्राहक चळवळ इत्यादी . चळवळी या नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात व सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडुणनकीसाठी चळवळी होत असतात . सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी अनेक लोक एकत्र येऊन सामूहिक आंदोलन करतात . सामाजिक प्रश्नांसंबंधी सर्व माहिती आंदोलन करणारे कार्यकर्ते शासनाला देतात . चळवळींमुळे शासनाला त्यांच्या प्रश्नांची दाखल हि घ्यावीच लागते . शासनाच्या निर्णयांना , धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी काम करतात . सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडविण्यासाठीच चळवळी होतात असे नाही . तर शासनाच्या काही निर्णयांना व धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी होतात . लोकशाही पद्धतीत जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो , म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते .

Similar questions