लिखित मजकुरासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असतो. विरामचिन्हांच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण
वाक्याचा अर्थ बदलू शकतो व भाषेचा बाजही बिघडू शकतो. भाषा योग्य स्वरूपात अर्थवाही होण्यासाठी विरामचिन्हांच्या योग्य वापराचा अभ्यास व सराव होणे आवश्यक आहे.
५.खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) ते बांधकाम कसलं आहे
(२) आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
(३) गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत
(४) अरेरे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले
(५) आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "वनवासी" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत. वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यांतील जीवन, निसर्ग, निसर्गविषयीचे प्रेम त्यातील अतूट नाते यांचे वर्णन या कवितेतून कवीने केले आहे. 'वळीव' या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता घेतली आहे.
★ खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहली.
(१) ते बांधकाम कसलं आहे
उत्तर- ते बांधकाम कसलं आहे?
(२) आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
उत्तर- आकाशकंदील पूर्ण झाल्यावर, दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला.
(३) गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत
उत्तर- गुलाब, जास्वंद, माेगरा ही माझी आवडती फुले आहेत.
(४) अरेरे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले
उत्तर- अरेरे! त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले!
(५) आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे
उत्तर- आई म्हणाली, 'सोनम, चल लवकर, उशीर होत आहे.'
धन्यवाद...