लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निम्मीत मराठीतून भाषण
Speech on lal bahadur shastri jayanti in Marathi
Answers
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील मुगलसराय येथे झाला होता. त्यांचे वडील एका शाळेत शिक्षक होते जे लाल बहादुर शास्त्री केवळ एक वर्षांचे असताना वारले .त्यावेळी त्यांच्या आई वीस वर्षांच्या होत्या त्यांनी त्यांचा तीन मुलांस घेऊन आपल्या वडिलांच्या घरी आल्या आणि तिथे स्थायिक झाल्या . लाल बहादुर यांचे शिक्षण लहान गावात झाले , परंतु घरात त्रास देणारी गरीबी असूनही त्यांना चांगले बालपण लाभले.
उच्च शिक्षणासाठी त्यांना वाराणसीतील काकाबरोबर राहण्यासाठी पाठविण्यात आले.तेव्हा त्यांना घरी छोटे म्हणत असत . बिना चप्पल शिवाय ते शाळेत जात असत .
लाल बहादुर शास्त्री स्वातंत्र्यासाठी लढा देत असत. लाल बहादुर जी भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतेही होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक सक्रिय सदस्य म्हणून होते. जांच्यावर महात्मा गांधींचा खोलवर प्रभाव होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते एक मेहनती समर्थक होते . ते भारताचे प्रामाणिक आणि महान पंतप्रधान होते. ते एक खरे प्रशासक ज्याने स्पष्टपणे आपले नेतृत्व गुण प्रकट केले होते. भारतीय समाजात जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक दुष्परिणामांचा खोलवर प्रभाव पडला आणि सुधारणेचे चिन्ह म्हणून अनेक सुधारकांनी या वाईट गोष्टींशी लढण्यासाठी पुढाकार घेतला, परंतु लाल बहादुर शास्त्री एकुलता एक माणूस होता ज्याने याच्या विरोधात कठोरपणे लढा दिला. आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रात महान सुधारणा त्यांच्यामुळे झाली आणि त्यांनी देशातील शेतकऱ्यांचा आदर केला. लाल बहादुर शास्त्री यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला होता .त्यांची कृषी क्षेत्रातील मेहनत म्हणजे ग्रीन रेव्होल्यूशन. भारतीय शेतीची पुनरुत्पादन आणि शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी ग्रीन रेव्होल्यूशन ही पहिली पायरी होती.
११जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद शांतता करारनाम्यावर सही केल्यानंतर उजबेकिस्तानमध्ये लाल बहादुर शास्त्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारत रत्न देऊन गौरवण्यात आले, जे आपल्या देशातील एखाद्या व्यक्तीस दिलेला सर्वात मोठा सन्मान मानला जातो. विजय घाट, नवी दिल्ली येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले.