छत्री विषयावर या मराठीतून निबंध
Essay on umbrella in Marathi
Answers
छत्री म्हणजे प्राथमिकरित्या उन व पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बनवलेली वस्तू होय. धातूच्या तारांवर किंवा बांबूच्या कामट्यांवर ताणून बसवलेले कापड, आणि कापडावर तेलाचा थर अशी याची रचना असते. मध्यभागी धरण्यास एक दांडा असतो. काही वेळा छत्रीची घडी ही करता येते.
☂️☂️☂️☂️☂️☂️☂️☂️☂️☂️☂️☂️☂️
छत्रीला इंग्रजी मध्ये आम्ब्रेला म्हणतात. अम्ब्रेला हा शब्द लॅटिन भाषेतील ‘अम्बरा’ या शब्दावरून घेतला आहे ज्याचा अर्थ सूर्यप्रकाशापासून वाचणे. मुसळधार पाऊस आणि जास्त सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी छत्र्या आवश्यक असतात .छत्री ही जगाच्या प्रत्येक कोप-यात वापरली जाते. १९ व्या शतकापासून भारतात छत्री वापरणे सुरू झाले.
छत्री लहान मुलापासून ते म्हातार्या व्यक्तिपर्यंत कोणीही सहज वापरू शकते . आणि आता तर खूप छोट्या छत्र्या देखील बाजारात आहेत ज्या सहज बॅगेत किवा पर्स मध्ये राहू शकतात . छत्र्यांचा शोध सुमारे ४००० वर्षांपूर्वी लागला. प्राचीन काळापासून भारत, चीन, ग्रीस आणि इजिप्तमध्ये छत्र्याचा वापर केला जात असे . छत्र्याचा वापर पहिल्यांदा पाऊस टाळण्यासाठी केला गेला नसून , प्रखर सूर्यप्रकाशाच्या किरणांपासून वाचण्यासाठी केला गेला. चीनच्या लोकांनी त्यांच्या छत्र्यावर पावसापासून संरक्षण करण्यासाठी आणि छत्री पाणी प्रतिरोधक बनण्यासाठी त्याच्यावर मेण लावले . प्रथम छत्री इंग्लंडच्या जॉन हेर्वे यांनी वापरला होती , तेव्हा छत्री पेटीकोट म्हणून ओळखली जात असे. यानंतर छत्री स्त्रियांसाठी एक सुंदर साधन म्हणून बनविली गेली.
धन्यवाद