World Languages, asked by sharvari5125, 6 months ago

L
१) स्वमत : प्रदूषित पर्यावरणावर मात करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल ते तुमच्या शब्दात
लिहा.​

Answers

Answered by BRAINLYBILALFAROOQ
0

Answer:

प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय

प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय

१. ध्वनी प्रदूषण बंद करा

२.  आपल्या टीव्ही , संगीत प्रणाली इ.चा आवाज कमी ठेवा .

३. गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका.   .

४. लाउडस्पिकरच्या  वापरापासून इतरांना परावृत्त करा..

५. लग्न समारंभामध्ये बँड, फटाक्यांचा वापर टाळा .

६. ध्वनी प्रदूषण संबंधित सर्व कायद्यांची माहिती करून घ्या.

हवा प्रदूषण टाळण्यासाठी हे करा

१. घरे , कारखाने , वाहने इ. तून होणाऱ्या धूरचे उत्सर्जन कमीत कमी ठेवा .

२. फटाक्यांचा वापर टाळा .

३. कचरा कचराकुंडीतच टाका. जाळून त्याची विल्हेवाट लावू नका

४. थुंकण्यासाठी भांडे किंवा वाहत्या गटारींचा वापर करा.

५. हवेच्या प्रदूषण संबंधित कायदे व नियमांची माहिती करून घ्या व त्यांचे पालन करा.

जल प्रदूषण टाळण्यासाठी हे करा

१ विहिरी, तलाव आणि सार्वजनिक नळ योजनेजवळ कचरा टाकू नका.

२. पाण्याच्या पाईपजवळ भांड्यांना कल्हई करू नका.

३. निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव वा धरणात टाकू नका.  

४. जल प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहित करून घ्या व त्याचे पालन करा..

रासायनिक प्रदूषण थांबवण्यासाठी हे करा

१. रासायनिक खताऐवजी सेंद्रियखत. पॉलिस्टरऐवजी सुती कपड्यांचा वापर, प्लास्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्यांचा वापर करा.

२. पॉलिथिनच्या पिशव्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. 

३. अधिकाधिक वृक्ष लावा व त्यांची जोपासना करा.

४.रासायनिक प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहित करून घ्या व त्यांचे पालन करा.

स्रोत - प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय

Explanation:

PLEASE MARK AS BRAINLIST ANSWER

Similar questions