World Languages, asked by krupawalikar1, 3 months ago

letter writing for mother in Marathi​

Answers

Answered by arnosaha2009
2

प्रिय अहो आई,

लग्न होण्याआधी मला वाटलं नव्हतं की, मी माझ्या सासूबाईंना ‘आई’ असं म्हणेन. पण आईऐवजी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या नावाने हाक मारणंही मला पटलंच नाही. आज पत्राद्वारे मला तुम्हाला अनेक गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं आहे. पण सर्वात आधी थँक्यू…. मला तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. हा वेळ जो माझ्या नव्या आयुष्यात मला अॅडजेस्ट करण्यासाठी तुम्ही दिलात. अगदी लहानपणापासून लग्न होईपर्यंत एका घरात वाढल्यावर अचानक लग्नानंतर नव्या माणसांसोबत नव्या घरात अॅडजेस्ट करताना फारच कठीण जातं. अनेक गोष्टी पटत नाहीत, आवडत नाहीत. पण तुम्ही नेहमी मला समजून घेतलंत (अजूनही समजून घेत आहात). तुम्ही प्रत्येकवेळी मला दिलेली साथ ही खूपच मौल्यवान आहे. ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.

वाचा - आईसाठी खास आईच्या कविता, मदर्स डे निमित्त खास भेट देऊन आईला द्या सरप्राईज

‘मदर्स डे’ला प्रत्येकजण आपल्या आईबद्दल व्यक्त होतो. पण या वर्षी मला तुम्हाला अनेक गोष्टींसाठी धन्यवाद करायचं आहे. तसंच तुमच्या मुलाला एक चांगला आणि समजूतदार व्यक्ती म्हणून वाढवल्याबद्दल खूप खूप थँक्यू. माझा जोडीदार हा खूपच चांगला पती आणि मित्र आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पुरूषाने कसं असावं याचं तो उत्तम उदाहरण आहे आणि याचं सगळं क्रेडीट तुम्हाला जातं.

थँक्यू आई….तुमच्या मुलाला तुम्ही बेसिक स्वयंपाक आणि घरातील इतर काम शिकवल्याबद्दल. जो माझ्या पाळीच्या दिवसात मला समजून घेतो आणि या विषयावर माझ्याशी खुलेपणाने बोलतोही. थँक्यू अशा मुलाला वाढवल्याबद्दल जो समजतो की, घर हे फक्त एका व्यक्तीने नाहीतर दोघांनीही समान भार उचलून चालवायचं असतं. मग ते बाहेरचं काम असो वा घरचं काम असो. तो मला प्रत्येकवेळी आपणहून मदत करतो. थँक्यू त्याला टीपिकल मुलांप्रमाणे न वाढवल्याबद्दल.

थँक्यू आई त्याला स्त्रियांचा मान कसा राखावा हे शिकवल्याबद्दल, त्यांना समजून घेण्याबद्दल आणि त्यांच्याशी कसं बोलावं हे शिकवल्याबद्दल. आपल्या जोडीदाराला फक्त एखाद्या दिवशी फुलं आणि चॉकलेट्स देऊन खूष करायचं नसतं तर प्रत्येक दिवशी समान वागणूक द्यायची असते हे त्याच्या मनावर बिंबवल्याबद्दल थँक्यू आई.

थँक्यू आई मला नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल. मी ऑफिसहून थकून आल्यावर माझ्याकडून काम करण्याची अपेक्षा न करता मलाही तुमच्या मुलांसमान वागवल्याबद्दल. कारण तुम्ही मला समजून घेतलं नसतं आणि सहकार्य केलं नसतं तर मला आज माझ्या करिअरमध्ये इतकी उंची गाठता आलीच नसती.

थँक्यू आई, मला लोकांकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आणि त्यांच्या चुकांना बाजूला सारून त्यांच्या प्रेम करण्याची शिकवण दिल्याबद्दल.

HOPES IT HELPS YOU

MARK AS BRAINLIEST

AND FOLLOW

Similar questions