Art, asked by choudharylaxmidevi0, 11 months ago

letter writing in Marathi​

Answers

Answered by Anonymous
10

साधना प्रिंटिंग प्रेस,

महात्मा गांधी रोड,

पुणे, ४११०२०.

२० जून २०१८.

प्रति,

नवीन बुक डेपो,

शिवाजी चौक ,

नासिक – ४२२००९.

विषय :- पुस्तकांचे वितरण

महोदय /महोदया ,

आपले दिनांक ९ जून २०१८ चे क्रमांक nbd/१७६ चे पत्र मिळाले. आपण ऑर्डर केल्याप्रमाणे आम्ही मराठी व्याकरण, बालभारती इयत्ता १ली ते ७वी पर्यंत आणि गणित ८वी ते १०वी पर्यंतचे एकूण २०० पुस्तकें पाठवित आहोत. त्यांच्या किंमती खालील प्रमाणे आहेत.

पुस्तकांचे नाव – दर रु. – नग – किंमत रु.

१. मराठी व्याकरण २० ४० ८००

२. बालभारती ४० १०० ४०००

३. गणित ६० ६० ३६००

एकूण किंमत : रु.८४००

आम्ही आपणास पुस्तकें मारुति कूरियर ने पाठवित आहोत. कंसाईनमेंट नंबर ४५६९२१ आहे. आपण पुस्तकें मिळाल्याची पोच द्यावी. आपण आम्हांस डिमांड ड्राफ्ट किंवा बैंक ट्रांसफर ने पैसे पाठवू शकता. त्यासाठी अकाउंट नंबर आणि बँकेचा तपशील आपणास पाठवत आहोत :

खातेदाऱ्याचे नाव : साधना प्रिंटिंग प्रेस.

बँकेचे नाव : स्टेट बैंक ऑफ इंडिया, कोरडेवाडी शाखा.

अकाउंट नंबर : ४२३४६६७६९३.

पोच मिळाल्यानंतर ८ दिवसांच्या आत पैसे पाठवावे. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक दिवसास १२% प्रमाणे व्याज द्यावे लागेल.

पुस्तकांची डिलीवरी वेळेवर न झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आम्ही कूरियर कंपनीशी पत्रव्यवहार करून आपणास मदत करू शकतो.

कळावे,

आपले स्नेहांकित,

Answered by prerna555
6

HERE IS YOUR ANSWER

श्री प्रकाश गोविंद राजे

गंगा को ओप. हौसिंग सोसायटी,

फ्लॅट नं ४१५, चौथा माळा,

आंबेडकर रोड, आंबेडकर नगर,

पुणे, पिन – ४११००२.

२० जुलै २०१८.

प्रति,

सार्वजनिक आरोग्य विभाग,

पुणे महानगर पालिका,

पुणे, ४११००१.

विषय :- घंटागाड़ी वेळेवर येणेबाबत.

महाशय,

मी श्री प्रकाश गोविंद राजे, आंबेडकर नगर येथे राहतो. गेले कांही दिवस आमच्या विभागात कचरा गोळा करण्यास घंटा गाड़ी वेळेवर येत नाहीं, किंवा कधी कधी येतच नाहीं. न येण्याबाबत काहीही सूचना सुद्धा दिली जात नाहीं.

आमचा विभाग अतिशय गजबजलेला असून, एकूण २५ सोसायट्या आहेत. एका सोसायटी मध्ये सरासरी १० फ्लॅट असल्यामुळे येथे एकूण २५० फ्लॅट आहेत. घंटागाड़ी न आल्यास इतक्या फ्लॅटसचा कचरा दररोज जमा होतो आणि कांही जण रस्त्यावर फेकतात. त्या मुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. त्यात मोकाट कुत्री आणि जनावरे यथेच्छ फिरत असतात. घाणीमुळे वास आणि डास/मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सध्या डेंग्यु, मलेरिया इत्यादि रोगांच्या साथी चालू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण जातीने ह्या बाबतीत लक्ष घालून संबन्धित घंटागाडीच्या ठेकेदाराला समज द्यावी आणि यापुढे घंटा गाड़ी वेळेवर येईल हयाची काळजी घ्यावी ही विनंती.

आपला,

प्रकाश गोविंद राजे.

Similar questions