Environmental Sciences, asked by nikita2019nnn, 10 months ago

लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू
निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत
आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार
आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर
होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी
तुम्ही कोणता उपाय सुचवाल?​

Answers

Answered by gadakhsanket
45

नमस्कार,

★ खगोलीय वस्तूची पृथ्वीशी टक्कर टाळणे -

समजा लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू पृथ्वीशी टक्कर होण्याच्या मार्गावर आहे. हे टक्कर टाळण्यासाठी आपल्याला प्रथम त्या वस्तूची नेमकी दिशा, वेग, कक्षा या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. खगोलीय वस्तू जर अजून पृथ्वीपासून दूर असेल तर तिची दिशा वळवण्याचा प्रयन्त करता येईल.

परंतु जर ती वस्तू पृथ्वीच्या कक्षेत अली असेल आणि दिशा बदलणे अशक्य असेल तर अशावेळी त्या खगोलीय वस्तूचा अवकाशातच स्फोट करून आपण तिची पृथ्वीवरील टक्कर टाळू शकतो.

धन्यवाद...

Similar questions