लघुउद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा.
Answers
Answer:
लघुउद्योग आपल्या देशाच्या आर्थिक वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.लघुउद्योग असे उद्योग आहेत ज्यात वस्तुनिर्माण, उत्पादनाचे काम लहान प्रमाणात केले जाते.मेणबत्ती,अगरबत्ती,खायचे पदार्थ,कागद,पेन,खेळणी बनवणे इत्यादी लघु उद्योगांची काही उदाहरणे आहेत.
लघुउद्योगाची वैशिष्ट्ये:
१.संसाधने: लघु उद्योग स्थानिक पातळीवर आणि सहज उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करतात.म्हणूनच, कच्चे माल आणि कामगार उपलब्ध असल्यास लघु उद्योग कोठेही सुरु आणि संचालित केले जाऊ शकतात.
२.तंत्रज्ञान: मोठ्या उद्योगांच्या तुलनेत, लघु उद्योगांमध्ये अल्प भांडवली गुंतवणूक असते आणि ते त्यांच्या बहुतांश उत्पादन उपक्रमांसाठी कामगार आणि मनुष्यबळावर अवलंबून असतात.त्यांचा तंत्रज्ञानाचा वापर कमी असतो.
३. लवचिकता: लघु उद्योग नियम किंवा उत्पादन पद्धतीतील नवीन बदल,एखाद्या नवीन उत्पादनाच्या येण्याने किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित सुधारणांशी मोठ्या उद्योगांच्या तुलनेत अधिक जुळवून घेणारी असतात.
Explanation:
Answer:
varil uttar barobar ahe