India Languages, asked by dalvinishtha07, 3 months ago

लहान पन देगा देवा | मुंगी साखरेचा रवा| ( अलंकार ओळखा)​

Answers

Answered by vikaskunale544
1

Answer:

लहान पन देगा देवा | मुंगी साखरेचा रवा|

उत्प्रेक्षा

Answered by rajraaz85
0

Answer:

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा। या तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अशा ओळी आहेत. या ओळींमध्ये तुकाराम महाराजांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे.

Explanation:

दृष्टांत अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती किंवा त्याच्यासारखेच दुसरे असे उदाहरण देणे म्हणजे दृष्टांत अलंकार होय .

तुकाराम महाराज म्हणतात आपण लहान असलो तर काहीही करू शकतो व त्याबद्दल आपल्याला कोणी शिक्षा करत नाही. मुंगी जरी लहान असले तरी ते साखर आरामात खावु शकते. व त्या एवढ्याशा साखरेच्या दाण्याने ती आनंदी होते पण तुम्ही जरी हत्तीसारखे मोठे असाल किंवा तुम्ही ऐरावत हत्ती असणार पण तुम्हाला माहुताचा अंकुश खावा लागतो. म्हणजे ज्याच्याकडे नम्रपणा नाहीये त्याला आयुष्यात नेहमी त्रास सहन करावाच लागतो .म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लहान मोठे असे काही नसते लहान मोठे पण हे तुमच्या कर्तृत्वावर ठरते. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगातून नम्रपणा किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करतात आणि म्हणतात लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।

Similar questions