Long essay on winter season in marathi
Answers
भारतात मुख्य ३ ऋतू आहेत. त्यापैकी हिवाळा हा डिसेंबर ते मार्च मध्ये पडणारा एक ऋतू. हिवाळा जेव्हा सुरु होतो तेव्हा पावसाळ्याचा चक्रातून मुक्त झाले असे वाटते. पण जेव्हा हा आपल्या पूर्ण स्वरूपात येतो तेव्हा सहन करणे खूप कठीण होते. हिवाळ्यात हाडे जमल्यासारखे होतात. हिमाचे चादर सगळीकडे विशेष करून पर्वतीय भागात पसरलेले आढळते. हिमस्खलनाच्या कित्येक घटना कित्येक लोकांवर दुर्दैव ओढवून आणते. माणसे, पशु पक्षी आणि सगळ्या प्राण्यांची ह्या हिवाळ्यात फजिती होते. तरीही हिवाळ्याचे आपले महत्व खूप आहे. म्हणूनच निसर्ग चक्रात हिवाळ्याला प्रमुख स्थान आहे.
हिवाळ्यात फुलगोभी, शिमला मिर्ची, पालक, गाजर, सफरचंद,कांदा हे प्रामुख्याने होणारे पिक आहेत. काही लोक रबीच्या पिकाची हि लागवड हिवाळ्यातच करतात. भारतात हिवाळ्यात भेट देण्यासाठी काही प्रेक्षक स्थळे हि आहेत ज्यांच्यात पुडुचेरी, शिमला, ऋषिकेश, कच्छ चे रण, उदयपूर ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हिवाळा भयावह असला तरी तो निसर्गाचा एक अंगच आहे आणि तो आपल्याला स्वीकारणे भागच आहे.