India Languages, asked by shirkek281, 9 hours ago

मी आणि माझा एकांत poem in Marathi?​

Answers

Answered by gaurim614
0

मनाला लागलेला किवतेचा छंद

आणि तो बेधुंद करणारा आनंद

सहसा असणारी मी निशब्द

तेव्हा हातातून निसटलेले हे शब्द

भान हरपुन गेलेले हे चित्त

मी आणि माझा एकांत.

.

चहूकडे दरवळलेला रातराणीचा सुगंध

त्यावरील काजवे भासती मज स्वच्छंद

चंद्रावर रागावलेल्या चांदणीची खंत

मी आणि माझा एकांत.

.

दुनियेच्या गर्दीत स्वतःला शोधण्यात मी गर्क

मग या "स्व'' साठी लावलेले तर्क-वितर्क

स्वपनातल्या स्वप्नांचा झालेला अंत

मी आणि माझा एकांत.

.

गेलेले क्षण आणि येणारी वेळ

दोघांचा न जुळणारा मेळ

विचारांचा चालतो असाच खेळ

हा लपंडाव बघण्यात रमुन जाते ही सांजवेऴ

अबोल ही निशा वारा हा शांत

शेवटी उरतो तो बस, मी आिण माझा एकांत.

Similar questions