India Languages, asked by jaiswalpriyanka837, 1 month ago

मी अनुभवलेला लाकडाऊन निबंध
In marathi ​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

बर्‍याच दिवसांपासून कोरोनाबद्दल ऐकायला, वाचायला आणि बघायलाही मिळतंय. जेे ़झालंय ते वाईटच आहे यात तिळमात्र शंका नाही. म्हणतात ना ‘सुक्याबरोबर ओलंही जळतं’ त्यातलाच हा प्रकार आहे. कारण हे जे लॉकडाऊन केलंय, ते खूप छान केलंय. त्यामुळे खूप ङ्गायदा आणि तोटाही झाला. मी ङ्गायद्याचंच बोलेन तर सर्वांत आधी प्रदूषण कमी झालं. सॅटेलाइट इमेजद्वारे बघायला मिळालं. दुसरी गोष्ट माणूस सकाळी उठला की धाव धाव धावतो. इतका धावतो की धडपडेपर्यंत धावतो. त्याला आळा घालणारा कुणी नसतो. त्याची धावाधाव कमी झाली. रस्त्यावरच्या सततच्या कर्कश्श आवाजांमुळे जरा शांती मिळाली. पुरुष वर्ग बायको-मुलांकडे जरा व्यवस्थित लक्ष देतोय. नाहीतर मुलं झोपलेली असतानाच बाबा कामावर, घरी येतील तेव्हा मुलं झोपलेली. ताळमेळ कुणाचा कुणाला मिळत नाही.

खरं तर प्रत्येकाला आता ह्या लॉकडाऊनचा अनुभव आला असेलच ना! कर्त्या-करवित्यांना खूप कंटाळा आला असेल कारण प्रत्येकाला बाहेर पडण्याची गरज आहे आणि सवयही झाली आहे. हे घरी राहणं जड जात असेल ना? पण नाहीतरी ही शांती तुम्ही कधी अनुभवणार? हे सर्व वाढत्या प्रदूषणामुळे झालंय. निमित्त कोणतंही असो. आज माणसांना कसलाच धरबंध राहिला नाही. कुणीही कधीही कुठेही जाऊ शकतो, कसलाही धंदा कुणीही करू शकतो, कसेही- कितीही पैसे कमावू शकतो, लग्नकार्य कितीही मोठ्या प्रमाणात करू शकतो. जत्रा असेल तर केवढी दुकाने, किती गर्दी, त्यात काय काय खाण्याचे पदार्थ- मग भाविक मुले-बाळे- आंधळे, पांगळे, भिकारी.. बरं ही जत्रा किती दिवस? ङ्गेरीवाले एक महिना हलतंच नाहीत. एवढंच नव्हे तर प्लॅस्टिक, नंतर त्यांचे वन-टू नंबर, त्यांच्या आंघोळी, कपडे धुणे, त्यांना कसले रोग असतील तर.., पैसा असेल तर त्यांची लङ्गडी इत्यादी.. तर एकंदर आजची परिस्थिती खूप गंभीर आहे. हे गांभीर्य प्रत्येकाने स्वतःपुरतं न बघता दुसर्‍ यांचाही विचार करून वागणं ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी घरातल्या जाणत्यांनी काही सांगितलं तर लगेचच मान्य करणारी मंडळी होती. पण आज जग एवढं पुढे गेलंय, की आम्ही शहाणपण दाखवायला लागलोय. पोलिसांचंच बघा ना. ते तुमच्यासाठी जिवाचं रान करताहेत, तर तुम्ही त्यांनाच शहाणपण दाखवताय? हे योग्य आहे का? तेसुद्धा तुमच्याआमच्यासारखे माणसंच आहेत. खरं तर कुणीच बाहेर पडायचं नाहीअसं आहे. पण त्यांना तर ज्यादा कामं पडलीत. त्यांना नाही कोरोनाचा त्रास, नाही इतर चिकित्सा करायची सोय. वरील अधिकारी काय आदेश देतील त्याप्रमाणे वागत चला. यामुळे निश्‍चितच प्रत्येकाचे कल्याण होणार.

तर आपण सर्वांनी कोरोनाविषयी जागृतता पाळू या. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या. पाणी स्वच्छ झालं, मोर मुक्तपणे रस्त्यावर आले, डॉलङ्गिन बाहेर आले.

Similar questions