मोबाईल चांगला की वाईट ? यावर तुमचं मत लिहा.
Answers
Answered by
1
आताच्या वेगाने धावत असलेल्या मुंबई शहरामध्ये नोकरी करणाऱ्या तरुण/तरुणींची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक ऑफीस मधे संगणक अथवा कॉम्प्युटर शिवाय कामे होतच नाहीत. संगणक आताच्या काळाची गरज झाला आहे. तसेच हल्ली प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल फोन हा असतोच.
ह्या आधुनिक उपकरणांशी सांगड घालताना माणसाची जीवन शैली बदलली आहे आणि आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत.
डोळ्यांचे वेगवेगळे आजार, लांबच कमी दिसणे इत्यादी वाढत चालले आहे. लोकांचे डोळे दुखतात, डोळ्यांचे आजार ह्यांना सामोरा जावं लागतं तसेच आपल्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
पण मोबाईल नसेल तर कामे अधुरी राहतील, आपण कोणाला फोन नाही करू शकणार, संपर्क तुटणार व कामे मंदावतील.
म्हणून मोबाईल हा कमी वापरावा असे मला वाटते
Similar questions