India Languages, asked by harpreetsaini415, 10 months ago

मोबाइल शाप की वरदान या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
72

मोबाईल हे यंत्र आज लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहित आहे. रात्री झोपण्याच्या वेळेपासून तर सकाळी पहाटे उठन्यापर्यंत प्रत्येक कार्यात मोबाईल कामात पडतो.मोबाईल मुळे देश-विदेशात असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांशी आपण संपर्कात राहतो. नवीन बातम्या, घडामोडी आपल्याला इंटरनेट, व्हॉट्सऍप, फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून मोबाईलवर एका सेकंदात मिळते. मोबाईलमुळे जगात क्रांती झाली हे खरेच त्यामुळे ते वरदानच आहे पण जर त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर नाहीतर मोबाईल शापही ठरू शकते.

Answered by halamadrid
13

■■मोबाइल - शाप की वरदान■■

आज, मोबाइल हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. मोबाइल हा विज्ञानाचा एक महत्वपूर्ण आविष्कार आहे आणि त्याचे वेगवेगळे फायदे आहेत.

मोबाइलमुळे,आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.मोबाइलमुळे आपल्याला घरबसल्या कार्यालयाचे काम करता येते.मोबाइलमुळे आपण घरबसल्या वस्तूंची खरेदी करू शकतो तसेच त्यावरून लाइट,गॅस,इत्यादिचे बिल भरता येते.

परंतु, मोबाइलचे काही तोटे देखील आहेत. मोबाईलमुळे आपण आपल्या कामावर,अभ्यासावर नीट लक्ष देत नाही.

काही लोकं सामाजिक हिंसा व खोटी बातमी पसरवण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअॅपचा वापर करतात.अश्लील चित्रे,एमएमएस बनवून लोकांना ब्लैकमेल केले जाते.सारखं मोबाइकडे पहिल्यामुळे आपल्या डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो.

अशा प्रकारे, मोबाइलचे फायदे तसेच तोटेसुद्धा आहेत. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की, आपण मोबाइलचा शाप म्हणून की वरदान म्हणून वापर करतो.

Similar questions