Hindi, asked by kailaswagh1970, 3 months ago

मोबिलेचे फायदे व तोटे

Answers

Answered by ps446
5

Answer:

मोबाइल वापराचे फायदे (Mobile che fayde in Marathi)

मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.  

आज कालच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमुळे  घर बसल्या अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.

तुम्ही मोबाईल मध्ये मनोरंजनासाठी गाणी ऐकू शकतात, गेम खेळू शकतात व चित्रपट पाहू शकतात.

आज कालचे मोबाईल स्लिम असल्याने तुम्ही त्यांना खिश्यात ठेवून कुठेही जाऊ शकतात.

मोबाईल फोनच्या कॅमेराने तुम्ही फोटो, व्हिडिओ बनवू शकतात.

मोबाईल फोन मध्ये कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक इ. सुविधा असतात, म्हणून आता तुम्हाला या सर्व गोष्टी सोबत नेण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल फोन च्या साह्याने आपण कॅलेंडर, कॅल्कुलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक या गोष्टी वापरू शकतात.

कुठेही जायचे असल्यास मोबाईल मध्ये गूगल मॅप आणि GPS च्या मदतीने आपण रस्ता शोधू शकतो.

मोबाईल फोन मुळे बँकेत न जाता, घरबसल्या एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे पाठविणे शक्य झाले आहे.

मोबाईलच्या साह्याने तुम्ही ऑनलाईन अन्न देखील मागवू शकतात.

मोबाईल मध्ये इंटरनेट ची सुविधा वापरून कोणतीही माहिती एका क्लिक वर मिळवता येते.

मोबाईल मध्ये फ्लॅश लाईट ची पण सुविधा असते याचा उपयोग अंधारात फोटो काढण्यासाठी होतो. परंतु तुम्ही याला टॉर्च म्हणून देखील वापरू शकतात.

व्यापारी लोकांना व्यवस्थित व्यापार करण्यात मोबाईल खूप मदत करतो.

Explanation:

Similar questions