मुंगी आणि कबूतर.
मुद्दे - एक मुंगी-----तळ्यात पडते----- बाहेर येता येत नाही - ----काठावर झाड ----त्यावर कबूतर----कबूतर पान टाकते. मुंगी पानावर काठावरयेते. जंगलात शिकारी येतो. -----त्याचा कबूतरावर नेम. -----मुंगी चावते. -----उपकारांची फेड. तात्पर्य.
Answers
उत्तर :
★ कथालेखन :
उपकाराची फेड
एक जंगल होते त्या जंगलांमध्ये एक मुंगी होती. मुंगी रोजच्याप्रमाणे जंगलात फिरत असताना तिला तहान लागते. मुंगी पाणी पिण्यासाठी जवळ असलेल्या तळ्याकडे जाते. पाणी पिता - पिता तिचा तोल जातो आणि ती पाण्यात पडते. पाणी खोल असल्यामुळे मुंगीला बाहेर पडणे अशक्य होते. हे सर्व जवळच असणाऱ्या झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले.
कबूतराने मुंगी ची मदत करण्याचे ठरविले आणि कबूतर झाडावरील पाने पाण्यात टाकू लागला. कबुतराने पाण्यात टाकलेली पाने पाण्यावर तरंगू लागली.
त्या पानाचा आधार घेऊन मुंगी पानावर चढून तळ्याच्या काठावर आली. मुंगीने कबुतरा चे प्राण वाचविल्याबद्दल आभार मानले आणि मुंगीने कबूतरास वचन दिले की, अडचणीच्या वेळेस मी पण तुला मदत करेन. कबुतराला वाटले एवढी छोटीशी मुंगी माझी काय मदत करणार?
काही दिवसानंतर त्या जंगलामध्ये एक शिकारी शिकारीसाठी आला. कबूतर त्याच्या नजरेस पडले. त्याला मारण्यासाठी शिकार्यांनी बंदुकीचा नेम धरला. हा प्रकार मुंगीने पाहिला तिने समयसूचकता दाखवत शिकाऱ्याच्या पायाला कडाडून चावा घेतला. चावा घेतल्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला आणि बंदुकीच्या आवाजामुळे कबुतर उडून गेले. मुंगीने आपल्या हुशारीने कबुतराचे प्राण वाचवले आणि आपल्या उपकाराची परतफेड केली.
कबूतराने मुंगी चे आभार मानले आणि मनातील असणारा गैरसमज (छोटीशी मुंगी मदत काय करणार ) दूर केला.
तात्पर्य :
कोणालाही कमी लेखू नये.
अडचणीच्या वेळी प्रत्येकाने एकमेकांची मदत केली पाहिजे कारण आपल्यालाही दुसऱ्यांची गरज पडते.